September 24, 2025

जपानी ‘सुशी’ या खाद्यपदार्थावरील विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १० जानेवारी, २०२४ : जपानी खाद्यसंस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जागतिक पातळीवर खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या जपानी सुशी या खाद्यपदार्थाचा इतिहास आणि आजवरचा प्रवास उलगडणाऱ्या ‘आय लव्ह सुशी २०२४’ या प्रदर्शनाचे आज पुण्यात उद्घाटन झाले. जपान फाउंडेशन, कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई व इंडो जपान बिझिनेस काउंसिल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड येथील चाणक्य इमारतीजवळ हे प्रदर्शन येत्या २० जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी एमआयटी संस्थेच्या मागील गेटने स्वप्नपूर्ती सभागृहाच्या जवळून प्रवेश करता येईल याची कृपया नोंद घ्यावी.