पुण्यामधे राज उपहार स्टोअरचे उदघाटन

पुणे, १४/१०/२०२२: गुजरातमधील आदिवासी व ग्रामीण महिलांनी बनवलेलेल्या स्नॅक्स , सेव्हरीज, मिठाई आणि सुगंध अशा राज उपहार स्टोअर चे उदघाटन मुक्तांगण पुनवर्सन केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर मनिषा संघवी आणि अर्चना संचेती यांच्या हस्ते १० कस्तुर कुंज , भोसले नगर येथे करण्यात आले. या वेळी राज उपहारचे पुण्यात सेवा देणारे राजचंद्र मिशनच्या प्रसिध्द गायिका मीता शहा , सोनल सोनिग्रा ,तुषार मेहता, दिशांत शहा,अमित मेहता, भरत मेहता ,रुपाल संचेती, सुशिला तलेरा, आदि उपस्थित होते.

मीता शहा यांनी सर्वाचे स्वागत केले . त्या म्हणाल्या कोरोना काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाइट होती. दक्षिण गुजरातमधील आदिवासी महिलांचा दर्जा वाढविणे ,त्यांना स्वावलंबी करणे ,त्यांच्यात विश्वास वाढविणे व त्यांचे सक्षमीकरण करुन त्यांच्या जीवनात सन्मान व आनंद देणे या सर्व गोष्टींसाठी पूज्यश्री गुरुदेव राकेशजी यांच्या राज उपहार या अभियानाची श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर ही सेवाभावी शाखा, हे कार्य करत आहे. या कार्याला आधिक मदत देण्यासाठी मीता शहा यांनी आपल्या घरी हे खास दालन उघडले आहे. आत्तापर्यत १५० पेक्षा जास्त वंचित आदिवासी महिलांना स्वावलंबन आणि उत्पन्नाचे एक सन्माननीय स्त्रोत मिळाले आहे.त्यांना रोजगाराची संधी, कौशल्य्य प्रशिक्षण, कच्चा माल आणि उपकरणे, सुरक्षित कायर्र्स्थळे, तसेच उत्पादन विपणन आणि वितरण प्रदान करून शेवटपर्यत समर्थन देत आहे. या प्रतिभावान आणि समर्पित महिला तुमच्या घरासाठी १०० हून अधिक मिष्टान्न, स्नॅक्स, सुगंध आणि उपय्ाुक्तता असलेले उत्पादने तयार करत आहेत. त्यांच्या मालाला उत्तम बाजारपेठ मिळावी म्हणून सुमारे २५ व्यापारी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.

पुणतांबेकर म्हणाल्या जेव्हा महिला स्वत:च्या पायावर उभ्या रहातात त्या वेळी त्यांच्यातील शक्ती मधे बदल होतो.त्यांना कल्पना येते की हा उपक्रम खुप महत्वाचा आहे.त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो .घरामधिल एक स्त्री मुलांना उत्तम शिक्षण व आरोग्य देऊन कुटुंबाचा विकास चांगला करते.

सोनल सोनिग्रा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.