लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला लुटले हडपसरमधील द्राक्ष संशोधन वेंद्रासमोरील घटना

पुणे, दि. २३ मे 2021: लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटल्याची घटना २० मे रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील द्राक्ष संशोधन वेंâद्रासमोर घडली. चोरट्यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने दोन हजारांची रोकड आणि मनगटी घड्याळ असा साडेचार हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आप्पासाहेब डोके (वय २९, रा. वुंजीरवाडी ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब २० मेला रात्री कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी साडेदहाच्या सुमारास ते लघुशंका करण्यासाठी द्राक्ष संशोधन वेंâद्राजवळ थांबले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी आप्पासाहेब यांना रस्त्यावर गाडी का थांबवली अशी विचारणा केली. चोरट्यांनी त्यांना दम देउन त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून खिशातील दोन हजारांची रोकड आणि मनगटी घड्याळ असा साडेचार हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तपास करीत आहेत.