विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा

शितल विजापूरे 

पुणे१५ ऑगस्ट २०२२: शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरातील विश्वकर्मा विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.

 

विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने पत्रकारितेच्या विभागाकडून वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राचार्य राधेश्याम जाधव तसेच प्राचार्य वैभव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

ध्वजारोहणाच्या वेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता चेतन कपाडनीस , विद्यापीठाचे उपाध्यक्ष वासुदेव गाडे आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.