September 24, 2025

22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताच्या अंकिता रैना व ऋतुजा भोसले यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 25 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताच्या ऋतुजा भोसले व अंकिता रैना या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये दुसरी फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती, झील देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या दुसरी फेरीत रशियाच्या दुसऱ्या मानांकित एनास्तेसिया तिकोनोवा हिने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. हा सामना 1तास १६ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये तिकोनोवाने श्रीवल्लीची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये तिकोनोवाने श्रीवल्लीला फारशी संधी न देता हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीने तिकोनोवाची दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली. पण तिकोनोवाने पुनरागमन करत पुढच्याच गेममध्ये तिची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी मिळवली. आपली आघाडी कायम ठेवत तिकोनोवाने श्रीवल्लीविरुद्ध हा सेट 6-2 असा जिंकून विजय मिळवला.

चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तजाने क्वालिफायर जपानच्या नाहो सातोचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(2), 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ऑस्ट्रियाच्या टीना नादिन स्मिथ हिने रशियाच्या आठव्या मानांकित तातियाना प्रोझोरोवाचा 6-3, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. फिलिपिन्सच्या पाचव्या मानांकित अलेक्झांड्रा एलाने लकी लुझर ठरलेल्या भारताच्या झील देसाईचे आव्हान 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले. जपानच्या तिसऱ्या मानांकित मोयुका उचीजिमाने स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले व अंकिता रैना या तिसऱ्या मानांकित जोडीने श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व वैदेही चौधरी यांचा 3-6, 6-4, 10-7 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. जपानच्या साकी इमामुरा व नाहो सातो यांनी दुसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडी व प्रार्थना ठोंबरे यांचा 6-4,6-2 असा पराभव केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी गट: दुसरी फेरी:
दरजा सेमेनिस्तजा(लात्विया) [1]वि.वि. नाहो सातो (जपान) 6-1, 6-7(2), 6-2;
अँका अलेक्सिया तोडोनी (रशिया)वि.वि. सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) 6-4, 3-6, 6-3;
एनास्तेसिया तिकोनोवा(रशिया)[2]वि.वि. श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती (भारत) 6-1, 6-2;
दलिला जाकुपोविक (स्लोवाकिया) वि.वि.हिमेनो साकात्सुमे (जपान) [4]6-4, सामना सोडून दिला;
मोयुका उचीजिमा(जपान)[3]वि.वि. व्हिक्टोरिया मोर्वायोवा (स्लोवाकिया) 6-3, 6-3;
अनौक कोवरमन्स(नेदरलँड)वि.वि. एनास्तेसिया कुलिकोवा (फिनलंड) 5-7, 6-0, 7-5;
अलेक्झांड्रा एला (फिलिपिन्स) [5]वि.वि. झील देसाई (भारत)6-1, 6-2;
टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रिया)वि.वि. तातियाना प्रोझोरोवा(रशिया)[8] 6-3, 7-5;

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)/फन्नी स्टोलर[1]वि.वि. एनास्तेसिया कुलिकोवा (फिनलंड)/डायना मार्सिचेविका(लात्विया)1-6, 7-6(2), 10-6;
साकी इमामुरा (जपान)/नाहो सातो (जपान)वि.वि. सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) [2] /प्रार्थना ठोंबरे (भारत) 6-4,6-2;
ऋतुजा भोसले(भारत)/अंकिता रैना(भारत)[3]वि.वि. श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती (भारत) /वैदेही चौधरी (भारत) 3-6, 6-4, 10-7;
अलेक्झांड्रा इला(फिलिपिन्स)[4] /दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)वि.वि. जेसी एने(अमेरिका)/लेना पापडकिस (जर्मनी) 6-4, 2-6, 10-4;