सोलापूर, 17 डिसेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओअॅसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकीत जोडीने केवळ 55 मिनिटाच्या लढतीत इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो व रशियाच्या एकटेरिना याशिना या दुस-या मानांकीत जोडीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवा हिने भारताच्या अव्वल मानांकीत अंकिता रैनाचा 5-7, 7-5, 6-3 असा तर इंडोनेशियाच्या आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहोने रशियाच्या डारिया कुडाशोवाचा 1-6, 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरी गटातील विजेत्यांना प्रीसीजन कॅमशाफ्ट्स लि. च्या वतीने यतीन शहा तर उपविजेत्या जोडीला जामश्री रियालटी लि च्या वतीने राजीव देसाई यांनी चषक व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
प्रार्थनाने आपले मनोगत व्यक्त करताना तिला मिळालेली बक्षिसाची रक्कम रु.५१,०००/- व चषक तीचे सोलापूरचे मूळचे प्रशिक्षक सुधीर सालगुडे यांना समर्पित केली
स्पर्धेचा सविस्तर निकाल-(मुख्य ड्रॉ) एकेरी गट- उपांत्य फेरी
अनास्तासिया कुलिकोवा (फिनलँड )[3] वि.वि अंकिता रैना (भारत)[1] 5-7, 7-5, 6-3
अनास्तासिया कुलिकोवा (फिनलँड )[3] वि.वि अंकिता रैना (भारत)[1] 5-7, 7-5, 6-3
प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो( इंडोनेशिया) [8] वि.वि डारिया कुडाशोवा (रशिया) 1-6, 6-4, 7-5
दुहेरी गट- अंतिम फेरी
अंकिता रैना ( भारत)/ प्रार्थना ठोंबरे ( भारत) [1]वि.वि प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो (इंडोनेशिया)/एकटेरिना याशिना (रशिया) [2] 6-1, 6-2
अंकिता रैना ( भारत)/ प्रार्थना ठोंबरे ( भारत) [1]वि.वि प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो (इंडोनेशिया)/एकटेरिना याशिना (रशिया) [2] 6-1, 6-2
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा