25000डॉलर पुरूष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या निकी कालियांदा पोनाचा याचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

मुंबई, 17 नोव्हेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित 25000डॉलर आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत भारताच्या निकी कालियांदा पोनाचा याने फ्रांसच्या सातव्या मानांकित आर्थर वेबरचा 6-4 7-6(5) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.  तर, सिद्धार्थ रावत, दिग्विजय प्रताप सिंग आणि सिद्धार्थ विश्वकर्मा या तीन भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  

जीए रानडे टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पुरुष दुसऱ्या फेरीत  सहाव्या मानांकित सिद्धार्थ रावत याने भरत निशोक कुमारनचा 6-4 6-2 असा सहज पराभव केला. दिल्ली येथे तीन आठवड्यापूर्वी पार पडलेल्या आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या दिग्विजय प्रताप सिंग याने रशियाच्या इव्हान डेनिसोव्हचा 2-6 6-4 7-6(3)  असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या संदेश कुरलेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या सिद्धार्थ विश्वकर्मा याने फैजल कुमारचे आव्हान 6-1 6-2 असे संपुष्टात आणले.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या फैजल कुमार व नितीन कुमार सिन्हा या जोडीने रशियाच्या बेखन अटलांजेरिव्ह व इव्हान डेनिसोव्ह या चौथ्या मानांकित जोडीचा 6-2 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. चुरशीच्या लढतीत तुषार मदन व जगमीत सिंग यांनी भरत निशोक कुमारन व ऋषी रेड्डी यांचा टायब्रेकमध्ये  7-6(6) 3-6 [13-11] असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: पुरुष:
ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका)[1]वि.वि.संदेश कुरले(भारत) 6-0, 6-0;
डॉमिनिक पालन(चेक प्रजासत्ताक)[4] वि.वि.रिषभ अगरवाल(भारत)7-6(7) 6-2  
सिद्धार्थ रावत(भारत)[6] वि.वि.भरत निशोक कुमारन(भारत) 6-4 6-2  
निकी कालियांदा पोनाचा (भारत)वि.वि.आर्थर वेबर(फ्रांस)[7] 6-4 7-6(5)  
दिग्विजय प्रताप सिंग(भारत)वि.वि.इव्हान डेनिसोव्ह(रशिया)2-6 6-4 7-6(3)
काझुकी निशिवाकी(जपान)वि.वि.करण सिंग(भारत) 4-6 6-4 6-0  
सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)वि.वि.फैजल कुमार(भारत)  6-1 6-2  
रियुकी मत्सुदा(जपान)वि.वि.बेखन अटलांजेरिव्ह(रशिया)[8]4-6 6-2 6-3  

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
व्लादिस्लाव ऑर्लोव्ह(युक्रेन) /विष्णू वर्धन (भारत) [1]वि.वि.गुंजन जाधव(भारत)/लक्ष्मी सूद(भारत)6-2 6-2  
तुषार मदन (भारत) / जगमीत सिंग(भारत)वि.वि.भरत निशोक कुमारन(भारत)/ ऋषी रेड्डी(भारत)7-6(6) 3-6 [13-11]  
रित्विक चौधरी बोल्लीपल्ली(भारत) /निकी कालियांदा पूनाचा(भारत)[2]वि.वि.ऋषभ अग्रवाल(भारत) /साई कार्तिक रेड्डी गांटा(भारत) 6-3 6-3  
फैजल कुमार(भारत)/नितीन कुमार सिन्हा(भारत)वि.वि.बेखन अटलांजेरिव्ह(रशिया)/इव्हान डेनिसोव्ह(रशिया)[4] 6-2 6-4