सोलापूर, 24 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद संपादन केले.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. हा सामना 1तास 24मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. चौथ्या गेम पर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. सहजाने दहाव्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये सहजाने आक्रमक खेळ केला. चौथ्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 5-2 अशी आघाडी घेतली. एकतेरिनाने सहजाची सातव्या गेम मध्ये सर्व्हिस रोखली. पण पुढच्याच गेमला सहजाने एकतेरिना ची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील विजेत्या सहजा यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व 3,29,605रुपये, तर उपविजेत्या एकतेरिना मकारोवा हिला करंडक व 1,29,881 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसीजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे यतीन शहा, ओएसीस मॉलचे डॉ.शंतनू गांधी व सिद्धार्थ गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी यतीन शहा यांनी सोलापूर च्या 10 वर्षाखालील गटात महाराष्ट्रात प्रथम मानांकित यशवंतराजे पवार व तृतीय मानांकित श्लोक आळंद यांना 2024या वर्षाकरिता प्रिसीजनच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर केली. याशिवाय सामन्यातील उत्कृष्ठ बॉल बॉय म्हणून ऋषिकेश चव्हाण तर गारगी ओक ला उत्कृष्ठ बॉल गर्ल म्हणून भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी विजेती खेळाडू सहजा यमलापल्ली हिच्या हस्ते लॉन टेनिस मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संध्याराणी बंडगर व आकृती सोनकुसरे यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील खेळाडूंसाठी ट्रान्सपोर्ट ची सोय गांधी हुंडाई च्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या या सहकार्या बद्द्ल ब्रिजेश गांधी यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील खेळाडूंसाठी फिझिओथेरोपीस्टची व्यवस्था मेहुल पटेल यांच्या वतीने करण्यात आली होती
निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी: महिला:
सहजा यमलापल्ली (भारत)[7]वि.वि.एकतेरिना मकारोवा(रशिया)[2] 6-4, 6-3.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय