मुंबई ३ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती, झील देसाई यांनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत २२ वर्षीय वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हीने दुसऱ्या मानांकित ग्रीसच्या व्हॅलेंटिनी ग्रामतीकोपोलूचा ६-३,६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. डब्लूटीए स्पर्धेत श्रीवल्लीने पदार्पणातच ग्रीसच्या जागतिक क्र.११७ खेळाडू व्हॅलेंटिनीवर अफलातून विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये व्हॅलेंटिनी ३-१ अशा फरकाने आघाडीवर होती. पिछाडीवरून श्रीवल्लीने जोरदार कमबॅक करत हा सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीने वरचढ खेळ करत व्हॅलेंटिनीविरुध्द ६-२ असा जिंकून विजय मिळवला.
यावेळी श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती म्हणाली, डब्लूटीएची पहिलीच स्पर्धा खेळत असल्यामुळे मी उत्सुक होते. आजच्या सामन्यात मी माझा सर्वोत्तम खेळ खेळले. एमएसएलटीए आणि डब्ल्यूटीए हे अशा स्पर्धा आयोजित करून चांगले काम करत आहेत. महिलांसाठी अशा अनेक स्पर्धा होत असल्यामुळे आणखी जोमाने खेळण्यास आम्हाला प्रेरणा मिळते. एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेमुळे उच्च स्तरावर खेळण्याची व आपल्या मानांकनात सुधारणा करण्याची संधी मिळते, ही आमच्यासाठी खूप चांगली बाब आहे.
वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या झील देसाईने ग्रीसच्या सातव्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा ६-२, ६-१ असा सहज पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत भारताच्या वैदेही चौधरीने सर्बियाच्या चौथ्या मानांकित देजाना राडानोविच ३-२ असा पराभव केला. राडानोविचने सामन्यातून माघार घेतल्यामुळे वैदेहीला पुढे चाल देण्यात आली. अव्वल मानांकित जपानच्या हिमेनो साकात्सुमेने भारताच्या आकांक्षा नित्तुरेला ६-३, ६-१ असे पराभुत केले. कोरियाच्या दहाव्या मानांकित सोहयुन पार्क हिने भारताच्या मधुरीमा सावंतचा ६-१, ६-१ असा पराभव केला.
निकाल: पहिली पात्रता फेरी:
हिमेनो साकात्सुमे (जपान)(१) वि.वि.आकांक्षा नित्तुरे (भारत)६-३, ६-१;
लीना ग्लूशको(इस्त्राईल)वि.वि.एन-शूओ लियांग (तैपैई) (५)५-७, ६-१, ७-६(५);
व्हिक्टोरिया मोर्वायोवा (स्लोवाकिया)वि.वि. कोनी पेरीन(१२)१-६,६-४,६-१;
श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती (भारत)वि.वि.व्हॅलेंटिनी ग्रामतीकोपोलू (ग्रीस)(२)६-३,६-२;
झील देसाई(भारत)वि.वि.सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) (७)६-२, ६-१;
कॅमिला रोसटेलो(इटली)वि.वि.झिबेक कोलंबायेवा(कझाकस्तान) ४-६,६-३,६-४;
अमनदिनी हासे (फ्रांस)(९)वि.वि.समीक्षा श्रॉफ (भारत) ६-१, ६-०;
सोहयुन पार्क(कोरिया)(१०)वि.वि.मधुरीमा सावंत(भारत)६-१, ६-१;
फॅनी स्टोलर(हंगेरी)(६)वि.वि.नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)५-७,७-५,६-१;
वैदेही चौधरी (भारत) वि.वि.देजाना राडानोविच (सर्बिया)(४)३-२ सामना सोडून दिला;
पेंगतारण प्लीपुच (थायलंड) वि.वि.डायना मार्सिचेविका(लात्विया)६-२, ६-०;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय