पुणे, 23 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत वैष्णवी आडकर, मधुरीमा सावंत, वैदेही चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित रशियाच्या एनास्तेसिया तिकोनोवाने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(7) असा पराभव केला. हा सामना 1तास 48मिनिटे चालला. सामन्याच्या सुरुवातीला तिकोनोवाने वैष्णवीची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी घेतली. 4-2 अशा स्थितीत सामना असताना वैष्णवीने तिकोनोवाची सर्व्हिस ब्रेक करून ही आघाडी कमी केली. पण तिकोनोवाने जोरदार खेळ करत हा सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये वैष्णवीने सुरेख सुरुवात करत दुसऱ्या गेममध्ये तिकोनोवाची सर्व्हिस भेदली व 3-0 अशी आघाडी मिळवली. पण वैष्णवीला आपली आघाडी टिकवता आली नाही. 5-5 असा बरोबरीत सामना सूरू असताना दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये तिकोनोवाने वैष्णवीविरुध्द वरचढ खेळ करत हा सेट 7-6(9-7) असा जिंकून विजय मिळवला.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या नेदरलंडच्या अनौक कोवरमन्सने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या मधुरिमा सावंतचा 6-2,6-1 असा सहज पराभव केला. रशियाच्या आठव्या मानांकित तातियाना प्रोझोरोवा हिने भारताच्या वैदेही चौधरीचा 1-6, 7-5, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
चुरशीच्या लढतीत नवी मुंबई येथे मागील आठवड्यात झालेल्या आयटीएफ स्पर्धेतील विजेती खेळाडू जपानच्या तिसऱ्या मानांकित मोयुका उचीजिमाने लात्वियाच्या डायना मार्सिचेविकाचा 3-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. क्वालिफायर ऑस्ट्रियाच्या टीना नादिन स्मिथ हिने थायलंडच्या पुनिन कोवापिटुकटेडचे आव्हान 6-3, 6-0 असे मोडीत काढले.
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले व अंकिता रैना या तिसऱ्या मानांकित जोडीने अनौक कोवेरमन्स व एकतेरिना याशिना यांचा 6-4, 4-6, 10-5 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन आमदार सिध्दार्थ शिरोळे, नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)चे व्यवस्थापकीय संचालक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि भारताची माजी अव्वल टेनिसपटू व फेड कुपर राधिका तुळपुळे – कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्र्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर, संग्राम चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
मोयुका उचीजिमा(जपान)[3]वि.वि.डायना मार्सिचेविका(लात्विया)3-6, 6-2, 6-3;
एनास्तेसिया तिकोनोवा(रशिया)[2]वि.वि.वैष्णवी आडकर(भारत) 6-3, 7-6(7);
अनौक कोवरमन्स(नेदरलँड)वि.वि.मधुरिमा सावंत(भारत)6-2,6-1;
टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रिया)वि.वि.पुनिन कोवापिटुकटेड(थायलंड)6-3, 6-0;
तातियाना प्रोझोरोवा(रशिया)[8]वि.वि.वैदेही चौधरी(भारत)1-6, 7-5, 6-4;
अँका अलेक्सिया तोडोनी (रशिया)वि.वि. कॅमिला रोसाटेलो(इटली)7-6(0), 6-1;
दुहेरी: पहिली फेरी:
साकी इमामुरा (जपान)/नाहो सातो (जपान)वि.वि.रिना सायगो(जपान)/युकिना सायगो(जपान)6-3, 6-2;
जेसी एने(अमेरिका)/लेना पापडकिस (जर्मनी)वि.वि.स्नेहल माने (भारत)/सोहा सादिक(भारत)6-2, 6-1;
नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)/फन्नी स्टोलर[1]वि.वि.पूजा इंगळे (भारत)/आकांक्षा नित्तूरे(भारत)6-2,6-3;
ऋतुजा भोसले(भारत)/अंकिता रैना(भारत)[3]वि.वि.अनौक कोवेरमन्स(नेदरलंड)/एकतेरिना याशिना(रशिया)6-4, 4-6, 10-5
एनास्तेसिया कुलिकोवा (फिनलंड)/डायना मार्सिचेविका(लात्विया)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)/सहजा यमलापल्ली(भारत)3-6,6-4,10-6
अलेक्झांड्रा इला(फिलिपिन्स)[4] /दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)वि.वि.यू-युन ली (तैपेई)/एरी शिमिझू (जपान)6-7(7), 6-1, 10-7.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय