सोलापूर, 19 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर, वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैष्णवी आडकरने पोलंडच्या ऑलिव्हिया बर्गलरचा 7-5, 6-0 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जपानच्या साकी इमामुराने भारताच्या आकांक्षा नित्तूरेचा 7-5, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आठव्या मानांकित वैदेही चौधरी हिने झील देसाईचे 6-1, 6-2 आव्हान संपुष्टात आणले. चुरशीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडीने रशियाच्या एकतेरिना याशिनाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(5) असा पराभव करून आगेकूच केली.
दुहेरीत पहिल्या फेरीत झील देसाई व प्रांजला येडलापल्ली यांनी स्मृती भसीन व पूजा इंगळे यांचा 7-5, 4-6, 10-5 असा तर, दुसऱ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी या जोडीने स्नेहल माने व आकांक्षा नित्तूरे यांचा 6-0, 6-1 असा सहज पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी महिला गट:
साकी इमामुरा(जपान)वि.वि.आकांक्षा नित्तूरे(भारत)7-5, 6-1;
वेरोनिका बसझाक (पोलंड)वि.वि.चेल्सी फॉन्टेनेल (स्वित्झरलँड)6-3, 1-0
वैदेही चौधरी (भारत)[8] वि.वि.झील देसाई (भारत)6-1, 6-2;
सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस)[3]वि.वि.एकतेरिना याशिना(रशिया)6-4, 7-6(6);
हिरोमी आबे (जपान)वि.वि. सोहा सादिक (भारत) 3-6, 6-4, 6-1;
वैष्णवी आडकर (भारत) वि.वि.ऑलिव्हिया बर्गलर (पोलंड)7-5, 6-0
दुहेरी: पहिली फेरी:
झील देसाई (भारत)/ प्रांजला येडलापल्ली(भारत)वि.वि. स्मृती भसीन (भारत)/पूजा इंगळे(भारत)7-5, 4-6, 10-5;
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत)/वैदेही चौधरी(भारत)[2]वि.वि. स्नेहल माने(भारत)/ आकांक्षा नित्तूरे(भारत)6-0, 6-1;
एकतेरिना काझिओनोवा / एकतेरिना याशिना(रशिया)[3] वि.वि.नैनिका रेड्डी बेंद्रम(भारत)/आकृती सोनकुसरे(भारत)6-0, 6-3;
डायना मार्सिचेविका(लात्विया)/सॅपफो साकेल्लारिडी(ग्रीस)[1]वि.वि.श्राव्या शिवानी चिलकलापुडी(भारत)/जेनिफर लुइखेम(भारत)7-6(5), 6-0.
वैष्णवी आडकर (भारत)/ सहज यमलापल्ली(भारत)वि.वि. मधुरिमा सावंत(भारत)/बेला ताम्हणकर(भारत)6-2, 6-2;
हुमेरा बहरमुस (भारत)/ऑलिव्हिया बर्गलर(पोलंड)वि.वि. अलेक्झांड्रा अझारको / सौम्या विज(भारत) 6-2, 6-4.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय