बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहोला विजेतेपद

सोलापूर, 18 डिसेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओअॅसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत इंडोनेशिया आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो हिने फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवा हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत 1तास 5मिनीट चाललेल्या सामन्यात इंडोनेशिया आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो हिने फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवा हिचा एकतर्फी लढतीत 6-4, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 3935डॉलर(3,25, 000रूपये) व 50डब्ल्यूटीए गुण व उपविजेत्या खेळाडूला 2107डॉलर(1,74, 000रूपये) व 30 डब्ल्यूटीए गुण असी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्रीमती.शीतल तेली – उगले , आयुक्त , सोलापूर महानगर पालिका यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राम रेड्डी , डॉ.शंतनू गांधी , सिद्धार्थ गांधी , राजीव देसाई , लीना नागेशकर , माया खंडी , मोनिका आळंद उपस्थित होते. आर्यन येमुल ला बेस्ट बॉल बॉय तर अविघ्ना अंटड बेस्ट बॉल गर्ल म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-(मुख्य ड्रॉ) एकेरी गट- अंतिम फेरी
प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो( इंडोनेशिया) [8] वि.वि अनास्तासिया कुलिकोवा (फिनलँड )[3] 6-4, 6-2.