September 24, 2025

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत ईश्वरी मातेरे, कायरा चेतनानी, बेला ताम्हणकर, सेजल भुतडा यांची आगेकूच

नवी मुंबई, 24 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत ईश्वरी मातेरे, कायरा चेतनानी, बेला ताम्हणकर, सेजल भुतडा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या ईश्‍वरी मातेरेने जिया परेराचा 6-3, 7-6(5) असा तर, कायरा चेतनानीने पूजा इंगळेचा 6-4, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या संधू गुरमानत कौरने भारताच्या आरती मुनियनचा टायब्रेकमध्ये 6-0, 6-7(3), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. लालित्य कल्लुरीने नेपाळच्या अभिलाषा बिस्तचे आव्हान 6-4, 7-6(5) असे संपुष्टात आणले. सेजल भुतडा हिने वंशिता पठानियाला 3-6, 6-4, 7-6(5) असे पराभूत केले.

निकाल: पहिली पात्रता फेरी: महिला:
लक्ष्मी गौडा (भारत)वि.वि.मधुरिमा सावंत(भारत) 6-3, 6-3;
प्रियांशी भंडारी(भारत)वि.वि.पावनी पाठक(भारत) 6-0, 6-4;
सोहा सादिक(भारत)वि.वि.अपूर्वा वेमुरी(भारत) 6-0, 6-1;
कायरा चेतनानी(भारत)वि.वि.पूजा इंगळे(भारत) 6-4, 7-5;
अभया वेमुरी(भारत)वि.वि.वारी शहा(भारत) 6-0, 6-0;
अलीन कमर फरहत (भारत)वि.वि.डेनिका फर्नांडो(भारत) 6-3, 6-3;
लालित्य कल्लुरी (भारत)वि.वि.अभिलाषा बिस्त(नेपाळ) 6-4, 7-6(5);
सेजल भुतडा (भारत)वि.वि.वंशिता पठानिया (भारत) 3-6, 6-4, 7-6(5);
संधू गुरमानत कौर (ऑस्ट्रेलिया)वि.वि.आरती मुनियन (भारत) 6-0, 6-7(3), 6-4;
एना सेडीशेवा (रशिया)वि.वि.निधित्रा राजमोहन(भारत) 6-2, 6-2;;
बेला ताम्हणकर (भारत)वि.वि.कायरा शेट्टी (भारत) 6-2, 6-3;
कुंडली मजगईने (भारत)वि.वि.सोनल पाटील (भारत) 1-6, 6-4, 6-2;
प्रत्युशा रचापुडी(भारत)वि.वि.यशस्विनी पांवर(भारत) 6-1, 3-0;
अलेक्झांड्रा अझारको (रशिया)वि.वि.समीक्षा श्रॉफ(भारत) 7-5, 6-1;
ईश्‍वरी मातेरे(भारत)वि.वि.जिया परेरा(भारत) 6-3, 7-6(5).