आमच्या आयुष्याला किंमत नाही का?

पुणे, ०६/०७/२०२१: निदर्शनाला बरोबर आठ दिवस झाल्यानंतर कचरा वेचकांसाठी विम्याचा मुद्दा कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने लावून धरला आहे. आज सकाळी मा. अतिरिक्त आयुक्त  कुणाल खेमनार (भा प्र से) यांनी शिष्ट मंडळाकडून निवेदन स्वीकारून चर्चा केली.

पुणे महानगपालिकेच्या मुख्य सभेने २०१५ आणि २०१७ मध्ये कचरा वेचकांचा विमा उत्रवण्याचा ठराव मंजूर केला होता. त्या पश्चात  आम  आदमी विमा योजनेचा हप्ता ही पालिकेने भरला. कचरा वेचून पोट भरणाऱ्यांना विमा लागू झाला.

केंद्रात सरकार बदलल्यावर आम् आदमी योजना रद्द करण्यात आली आणि त्याच्या जागी प्रधान मंत्री जीवन ज्योत बिमा योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना अस्तित्वात आल्या. त्याची अंमलबजावनी वारंवार मागील आणि आताच्या प्रशासनाशी वारंवार संवाद साधून सुद्धा अद्याप झालेली नाही. कोरोना महामारीच्या काळात देखील या कष्टकऱ्यांना विमा विरहित काम करावे लागते ही या शहराला लाजिरवाणी गोष्ट आहे. लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून मान्यता घेण्याचे आदेश खेमणार यंनी घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रशासनाला दिले आहेत. शिष्टमंडळात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा चिकरमाने, आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या दीपाली, आदित्य आणि सायली यांचा समावेश होता.