पुणे, २२ एप्रिल २०२५ः मुंबई येथील विलेपार्ले परिसरातील सुमारे ३० वर्षे जुने जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करून बांधकाम पाडले. या घटनेमुळे जैन समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला असून या पार्श्वभूमिवर आज जैन समाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजित केला होता.
या भूमिकेवर प्रतिक्रिया देत पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, “जैन समाजाच्या भावनांशी पूर्ण सहमत असून आम्ही त्यास पाठिंबा दर्शवित आहोत.” गेल्या काही काळापासून समाजातील विविध घटकांमध्ये असंतोष निर्माण व्हावा यासाठी अनेक घटक कार्यरत झालेले दिसत असून त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “समाजातील सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविणे शक्य आहे, असा आमचा विश्वास आहे. परंतु अशा असंतोष निर्माण करण्यात येणाऱ्या घटनांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.”
सर्व प्रशासकीय यंत्रणेला कोणतीही कारवाई करण्याआधी संबंधित सर्व समाज घटकांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या असून पुणे शहर भारतीय जनता पार्टी या प्रकरणात जैन समाजाबरोबर आहे, असा पाठिंबा यावेळी घाटे यांनी जाहीर केला.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार