पुणे: हाॅस्पिटल मध्ये महिला प्रसृती कक्षात शिरुन विनयभंग केल्याने सुपरवायझरवर गुन्हा

पुणे, १३/०७/२०२२: हाॅस्पिटल मध्ये महिला प्रसृती कक्षात शिरुन एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सुपरवायझरवर विनयभंगचा गुन्हा काेरेगावपार्क पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग येडगे (वय-३७,रा.पुणे) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत ३८ वर्षीय महिलेने पाेलीसांकडे आरोपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. २२ जून राेजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहांगीर हाॅस्पीटल मधील फिमेल जनरल वाॅर्ड येथे हाॅस्पिटलचा सुपरवायझर पांडुरंग येडगे अचानक शिरला. सदर जनरल वाॅर्ड मध्ये प्रसृती नंतरचे उपचार तक्रारदार महिला घेत असताना तिच्या बेडचे बंद पडद्या मागे बाळाला स्तनपान करत हाेती. मात्र, त्याचवेळी अचानक हाॅस्पिटलचा सुपरवायझर त्याठिकाणी शिरला, त्यावेळी तक्रारदार स्तनपान करत असताना त्याने समाेरुन पाहिल्याने तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली आहे. याप्रकरणी काेरेगावपार्क पाेलीस पुढील तपास करत आहे.