पुणे, १२ जुलै २०२२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी सर्वात लहान असलेले खडकवासला धरण आता १०० टक्के क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर लक्षात घेत, आज दुपारी 1 वाजल्यापासून धरणातून 11,900 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती स्वारगेटच्या मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.
खडकवासला धरण सोमवारी मध्यरात्रीपासून ७५ टक्के भरले होते. सतत सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता, धरणातून पाणी सोडण्यात येत होते. त्याची सुरुवात 1,000 क्युसेकने झाली होती, मात्र आता हे प्रमाण वाढवून 11,900 क्युसेक इतके करण्यात आले आहे. धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न