किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 14 डिसेंबरपासून प्रारंभ

पुणे, 25/10/2021: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 14 डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने

सुरुवात होणार असून महोत्सवाच्या निमंत्रण आरती किर्लोस्कर यांच्या हस्ते आज किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे आणि महोत्सवाची मध्यवर्ती कल्पना सांगणारी चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बोधचिन्ह अनावरण प्रसंगी महोत्सवाच्या निमंत्रण आरती किर्लोस्कर म्हणाल्या, पंधरावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मंगळवार दिनांक 14 डिसेंबर ते शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा महोत्सव प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत आहे.आपला अमूल्य निसर्ग वारसा जतन करण्यासाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद व देवाणघेवाणीसाठी एक सामायिक व्यासपीठ उन्नत करण्याची संधी हा चित्रपट महोत्सव आपल्याला बहाल करतो. सकस अन्न समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा महोत्सवाचा महत्त्वाचा मुख्य विषय आहे. या वर्षी किर्लोस्कर वसुंधरा च्या माध्यमातून समाजाचे आरोग्य निसर्गाचे आरोग्य आणि आपल्या अन्न व्यवस्थेची स्थिती या तीन पैलूंना केंद्रस्थानी ठेवून विविध चित्रपटांद्वारे हा महोत्सव सादर होणार आहे या तिन्ही विषयांचा समावेश दृष्टीने वापर करून नव्या आजारांना प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणे जीवसृष्टी धारण करण्याची क्षमता वाढवणे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण पर्यावरण राखणे यासाठी शाश्वत उपाययोजनांचा शोध घेणे हा उद्देश आहे.

..

महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड म्हणाले, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 14 वर्षांपूर्वी किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांनी सुरू केला. पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन ऊर्जा हवा पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम व चित्रपट यांना स्थान देणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा एकमेव अद्वितीय असा महोत्सव आहे. हा महोत्सव म्हणजे निसर्गाला जाणून घेण्याचा आणि पर्यावरणाशी निगडित विविध समस्यांचा प्रश्नांचा आणि पैलूंचा अभ्यास व विश्लेषण करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. सात राज्यातील तीस शहरांमधून आजतागायत आम्ही 250 पेक्षा जास्त महोत्सव आयोजित केले आहेत. जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे या आव्हानात्मक परिस्थितीचे रूपांतर बदल घडवून आणण्याच्या संधीत करण्याच्या उद्देशाने किर्लोस्कर वसुंधरा हा पंधरावा जागतिक आणि ऑनलाईन महोत्सव आयोजित करत आहोत.

 

महोत्सवाचे क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले, समाजाचे आरोग्य निसर्गाचे आरोग्य आणि आपल्या अन्न व्यवस्थेची स्थिती या तिन्ही विषयांचा समावेश दृष्टीने वापर करून नव्या आजारांना प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणे जीवसृष्टी धारण करण्याची क्षमता वाढवणे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण पर्यावरण राखणे यासाठी शाश्वत उपाययोजनांचा शोध घेणे हा उद्देश आहे.सहभागींना ह्या क्षेत्रात झालेली नवीन संशोधने समजतील. त्यातूनच त्यांना सभोवतालच्या निसर्गाची अवस्था सुधारण्यासाठी अमलात आणता येणाऱ्या अनेक मार्गांचा देखील परिचय या महोत्सवाद्वारे होईल, तसेच आपली जीवनशैली आरोग्यदायी करण्याच्या दिशेने करण्याजोगे बदल आणि नवी कौशल्ये यांचा जवळून परिचय होईल. प्राप्त झालेली ही नवी समाज आणि ज्ञानामुळे नव्या रोगांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचे आकलन तर होईलच शिवाय शाश्वत जीवनासाठी निसर्गाच्या सेवा मिळत राहाव्यात, संसाधनांनी समृद्ध निसर्ग राखता यावा याकरिता करावयाच्या उपाय योजनांना चालना मिळेल.

 

महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले, कोरोनामुळे परस्पर संवाद विचारविनिमय ऑनलाइन प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आणि या विषयातील जगभरातील बुद्धिमत्ता आणि विचार किर्लोस्कर वसुंधरा च्या व्यासपीठावर आणण्याची संधी या दृष्टीने आम्ही या परिस्थितीकडे पाहतो.संपूर्ण जगभरात सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या सूचना पर्यंत पोहोचण्यासाठी महोत्सवाची ही बदललेली रचना नक्कीच कामी येईल यामुळे प्रत्येक व्यक्ती मागचा कार्बन फूटप्रिंट कमी होईल अशी अपेक्षा आहे.सकस अन्न,समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा विषय यंदाच्या महोत्सवासाठी निवडला आहे या वर्षीचा महोत्सव चार दिवसांचा असेल. 14 ते 17 डिसेंबर असा या महोत्सवाचा कालावधी असेल.दररोज साडेचार तासांचे प्रक्षेपण असेल रोजचे प्रक्षेपण सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन तर पुनःप्रक्षेपण सायंकाळी 6 ते रात्री साडे दहा या वेळेत होणार आहे.

आपण खातो ते अन्न भोवतालच्या निसर्गाचे आरोग्य आणि निरोगी समाज यांचा एकमेकांशी असलेलं नातं विज्ञानाने ओळखलं आहे. या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान, कार्यशाळा, पॉडकास्ट, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, दृकश्राव्य व्याख्याने आणि समारोप समारंभ असा असणार आहे.

 

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातने डॉ. गुरुदास नूलकर, डॉ. राजश्री जोशी, स्वप्नील कुंभोजकर, आरती कुलकर्णी, डॉ. मंदार दातार, अनिरुद्ध चावजी, डॉ.प्रियदर्शनी कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली 70 नवीन चित्रफिती तयार केल्या आहेत, हे या महोतस्वाचे प्रमुख आकर्षन देखील आहे. बायफ, डाऊन टू अर्थ आणि गो वाईल्ड हे महोत्सवाचे नाॅलेज पार्टनर आहेत.

 

हा महोत्सव सर्वांसाठी विनामुल्य खुला असून नावनोदंणी आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छितांनी https://qr.page/g/ql50UFmvK या लिंकवर एकदाच नोंदणी करुन संपूर्ण महोत्सवात सहभागी होऊ शकतात.