गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत क्रिश त्यागी, सोनल पाटील, नंदिनी दिक्षित, ऐश्वर्या जाधव यांची आगेकूच

पुणे,दि.29 नोव्हेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात क्रिश त्यागी याने तर, मुलींच्या गटात सोनल पाटील, नंदिनी दिक्षित, ऐश्वर्या जाधव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात लकी लुझर ठरलेल्या ऐश्वर्या जाधव हिने अस्मी आडकरचा 7-5 6-0 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित सोनल पाटील हिने रुमा गायकवारीचा 6-1 6-1 असा सहज पराभव केला. पाचव्या मानांकित थायलंडच्या कामोनवान योडपेच हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या गौरी मानगावकरचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. सातव्या मानांकित फ्रांसच्या मार्गोट फंथाला हिने भारताच्या पुष्टी लड्डाचे आव्हान 6-1 6-1 असे सहज मोडीत काढले.

नंदिनी दिक्षित(भारत)वि.वि.एंजेलिस रॉड्रिगुएझ-रिझो(मेक्सिको)6-3 3-0सामना सोडून दिला;
 

मुलांच्या गटात पहिल्या फेरीत  भारताच्या दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीने प्रज्वल तिवारीचा 6-3, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.  दुहेरीत पहिल्या फेरीत पार्थ देवरुखकर व आर्यन सुतार या जोडीने अमेरिकेच्या श्रीकेशव मुरुगेसन व वरुण वर्मा यांचा 2-6 7-6(5) [10-8] असा तर, वेंकट ऋषी बाटलंकी व हनु पटेल या तिसऱ्या मानांकित जोडीने जय दीक्षित व अंशुल सातव यांचा 6-4 7-6(5) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी: मुले:

क्रिश त्यागी (भारत)[2]वि.वि.प्रज्वल तिवारी(भारत) 6-3, 6-1;
धनंजय  अत्रेया(भारत)वि.वि.सिद्धार्थ मराठे(भारत) 6-6 सामना सोडून दिला;

मुली:
मार्गोट फंथाला(फ्रांस)[7]वि.वि.पुष्टी लड्डा(भारत) 6-1 6-1;
नंदिनी दिक्षित(भारत)वि.वि.एंजेलिस रॉड्रिगुएझ-रिझो(मेक्सिको)6-3 3-0सामना सोडून दिला;
कामोनवान योडपेच(थायलंड)[5]वि.वि.गौरी मानगावकर(भारत)6-3, 6-3;  
सोनल पाटील(भारत)[2]वि.वि.रुमा गायकवारी(भारत) 6-1 6-1
माया राजेश्वरन रेवती(भारत)वि.वि.प्रिशा शिंदे(भारत)5-4 सामना सोडून दिला;
ऐश्वर्या जाधव(भारत)वि.वि.अस्मी आडकर(भारत)7-5 6-0;

दुहेरी: मुले: पहिली फेरी:
पार्थ देवरुखकर(भारत)/आर्यन सुतार(भारत)वि.वि.श्रीकेशव मुरुगेसन(अमेरिका)/ वरुण वर्मा(भारत) 2-6 7-6(5) [10-8]
वेंकट ऋषी बाटलंकी(अमेरिका)/हनु पटेल(अमेरिका)[३] वि.वि.जय दीक्षित(भारत)/अंशुल सातव(भारत) 6-4 7-6(5)
अलेक्झांडर दासक्लोवीच(सर्बिया)/चंदन शिवराज(भारत) वि.वि.सिद्धार्थ महादेवन(भारत)/कंधवेल महालिंगम अकिलांदेश्वरी(भारत)6-4 6-4;
बुशन होबम(भारत)[2] /दक्ष प्रसाद(भारत)वि.वि.आरव हाडा(अमेरिका)/तरुण कोरवार(भारत) 7-5, 7-5;
धनंजय अत्रेया(भारत)[4] /हितेश चौहान(भारत)वि.वि.ओमर सुमर(भारत)/प्रज्वल तिवारी(भारत)6-3, 6-4;

मुली:

सुहिता मारुरी (भारत) / मार्गोट फंथाला(फ्रांस)[1]वि.वि.अवनी चितळे(भारत)/प्रिशा शिंदे(भारत)6-1, 6-1;
रुमा गायकैवारी(भारत) / मधुरिमा सावंत(भारत)[3]वि.वि.सायना देशपांडे(अमेरिका)/नंदिनी दीक्षित(भारत) 6-1, 6-1;
नैनिका रेड्डी बेंद्रम(भारत)/सेजल भुतडा(भारत)वि.वि.लीने अबौहमद (ऑस्ट्रेलिया) / माया बुनियारूनेट(थायलंड) 6-1 1-6 [10-4]
सोनल पाटील(भारत)[4] / एंजेलिस रॉड्रिग्ज-रिझो(मेक्सिको)वि.वि.नियती कुक्रेती(भारत) / हन्ना नागपाल(भारत)5-7, 6-0 [12-10];
जन्नत चिरिपाल (भारत) / गौरी माणगावकर (इंडिया)वि.वि.चाहना बुधभट्टी (भारत) / मारिया मसिआंस्किया 7-5 3-6 [10-8]
लिडिया पॉडगोरिचनी(थायलंड) [२] / कमोनवान योडपेच(थायलंड)वि.वि.सिया प्रसादे(भारत)/इरा शाह(भारत) 6-1, 6-1.