September 24, 2025

एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत क्रिश सरोज,अनुप ऋषभ, बलराज बिराजदार यांचे सनसनाटी

पुणे, 3 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात क्रिश सरोज,अनुप ऋषभ, बलराज बिराजदार यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत चुरशीच्या लढतीत क्रिश सरोज आठव्या मानांकित रायन जॉर्जचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 1-6, 10-3 असा पराभव केला. बलराज बिराजदार याने तेराव्या मानांकित आरव मुदनूरचा 6-4, 7-6(2) असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला. अनुप ऋषभने चौदाव्या मानांकित तनुज संचेतीवर 6-0, 6-1 असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित पीयूष रेड्डीने कियान शहाचे आव्हान 6-2, 6-0 असे मोडीत काढले.

निकाल: दुसरी पात्रता फेरी: मुले:
रेयांश गुंड (1)वि.वि.अर्णव भट्टभट्ट 6-0, 6-2;
बलराज बिराजदार वि.वि. आरव मुदनूर (13) 6-4, 7-6(2);
पीयूष रेड्डी (2) वि.वि. कियान शहा 6-2, 6-0 ;
क्रिश सरोज वि.वि.रायन जॉर्ज(8) 7-6(3), 1-6, 10-3;
लव परदेशी(3) वि.वि.निमिश सोनवणे 6-1, 6-1;
अनुप ऋषभ वि.वि.तनुज संचेती(14) 6-0, 6-1;