November 2, 2025

पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत क्रिश शहा व अंगद ओबेरॉय, नित्या शहा व एरॉन थवानी यांची आगेकूच

पुणे, 1 नोव्हेंबर 2025: द पूना क्लब लिमिटेड आणि पीवायसी हिंदू जिमखाना या पुण्यातील प्रतिष्ठित अशा क्रीडा संस्थांच्या वतीने पहिल्या पूना क्लब पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत गट साखळी फेरीत क्रिश शहा व अंगद ओबेरॉय, नित्या शहा व एरॉन थवानी, तनिश बेलगलकर व रोनित जोशी, संचित दिवाडकर व अर्जुन राऊत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

पूना क्लब जलतरण संकुलात असलेल्या पिकल बॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत अ गटात क्रिश शहा व अंगद ओबेरॉय यांनी नित्या शहा व एरॉन थवानी यांचा 15-08 असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत क्रिश शहा व अंगद ओबेरॉय यांनी निमिष कुलकर्णी व करण जाधव यांचा 15-13 असा कडवा प्रतिकार केला. नित्या शहा व एरॉन थवानी या जोडीने आरुषी पांडे व आर्यन शिरोळे यांचा 15-08 असा पराभव केला.

ब गटात तनिश बेलगलकरने रोनित जोशीच्या साथीत वेदांत धाम व जुई पुसाळकर यांचा 15-06 असा तर, संचित दिवाडकर व अर्जुन राऊत यांनी वेदांत धाम व जुई पुसाळकर यांचा 15-09 असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन पुसाळकर ग्रुपचे संचालक रोहन पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूना क्लबच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष तुषार आसवानी, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रीडा विभागाचे सचिव नंदन डोंगरे, स्पर्धा समन्वयक संचित दिवाडकर, रणजीत पांडे आदी उपस्थित होते.

निकाल: गट साखळी फेरी:
गट अ:
क्रिश शहा/अंगद ओबेरॉय वि.वि.नित्या शहा/एरॉन थवानी 15-08;
नित्या शहा/एरॉन थवानी वि.वि.आरुषी पांडे/आर्यन शिरोळे 15-08;
निमिष कुलकर्णी/करण जाधव वि.वि.आरुषी पांडे/आर्यन शिरोळे 15-07;
क्रिश शहा/अंगद ओबेरॉय वि.वि.निमिष कुलकर्णी/करण जाधव 15-13;
नित्या शहा/एरॉन थवानी वि.वि.निमिष कुलकर्णी/करण जाधव 15-06;
क्रिश शहा/ अंगद ओबेरॉय वि.वि.आरुषी पांडे/ आर्यन शिरोळे 15-04;

गट ब:
तनिश बेलगलकर/रोनित जोशी वि.वि.वेदांत धाम/जुई पुसाळकर 15-06;
संचित दिवाडकर/अर्जुन राऊत वि.वि.वेदांत धाम/जुई पुसाळकर 15-09;
तनिश बेलगलकर/रोनित जोशी वि.वि.पृथ्वी शहा/आनंद शहा 15-07;
संचित दिवाडकर/अर्जुन राऊत वि.वि.पृथ्वी शहा/आनंद शहा 15-05;
तनिश बेलगलकर/रोनित जोशी वि.वि.संचित दिवाडकर/अर्जुन राऊत 15-11;
वेदांत धाम/जुई पुसाळकर वि.वि.पृथ्वी शहा/आनंद शहा 15-11;

गट क:
तनिश/लियान वि.वि.यश शहा/क्षितिज कोतवाल 15-12;
यश शहा/क्षितिज कोतवाल वि.वि.श्रेयस भामरे/जान्हवी 15-04;
अर्णव घई/रणवीर आनंद वि.वि.श्रेयस भामरे/जान्हवी 15-11;
अर्णव घई/रणवीर आनंद वि.वि. तनिश/लियान 15-12;
अर्णव घई/रणवीर आनंद वि.वि.यश शहा/क्षितिज कोतवाल 15-09;
तनिश/लियान वि.वि. श्रेयस भामरे/जान्हवी 15-05;

गट ड:
आकाश गुप्ता/राहुल गुप्ता वि.वि.आदित्य अभ्यंकर/अनीश राणे 15-09;
आकाश गुप्ता/राहुल गुप्ता वि.वि.अथर्व अय्यर/वेदांत गिरमे 15-09;
सुमैर पवनी/क्रिश आनंद वि.वि.अथर्व अय्यर/वेदांत गिरमे 15-11;
आकाश गुप्ता/राहुल गुप्ता वि.वि.सुमैर पवानी/क्रिश आनंद 15-12;
आदित्य अभ्यंकर/अनीश राणे वि.वि.अथर्व अय्यर/वेदांत गिरमे 16-14;
सुमैर पवनी/क्रिश आनंद वि.वि.आदित्य अभ्यंकर/अनीश राणे 15-13.