September 24, 2025

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत लक्ष्मी प्रभा अरुणकुमार, हुमेरा बहरमूस यांचा मुख्य फेरीत प्रवेश

नवी मुंबई, 25 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या लक्ष्मी प्रभा अरुणकुमार, हुमेरा बहरमूस यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत लक्ष्मी प्रभा अरुणकुमार हिने लक्ष्मी गौडाचा 6-3, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. सातव्या मानांकित भारताच्या हुमेरा बहरमूस ने पंधराव्या मानांकित जेनिफर लुइखेमचा 3-6, 6-2, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.

पोलंडच्या पाचव्या मानांकित वेरोनिका बसझाक हिने चौदाव्या मानांकित ऑलिव्हिया बर्गलरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जपानच्या सहाव्या मानांकित हिरोमी आबेने भारताच्या सोळाव्या मानांकित सौम्या विजचा 6-3, 6-0 असा तर, जपानच्या दुसऱ्या मानांकित अकिको ओमायने रशियाच्या अकराव्या मानांकित इओना झोनारूचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला:
वेरोनिका बसझाक(पोलंड)[5]वि.वि.ऑलिव्हिया बर्गलर(पोलंड)[14] 6-3, 6-2;
हिरोमी आबे(जपान)[6] वि.वि.सौम्या विज(भारत)[16] 6-3, 6-0;
लक्ष्मी प्रभा अरुणकुमार (भारत)वि.वि.लक्ष्मी गौडा (भारत) 6-3, 6-4;
एकतेरिना काझिनोवा(रशिया)[9]वि.वि.कॅमिला बारटोन(लात्विया)[4] 6-4, 6-0;
अकिको ओमाय(जपान)[2]वि.वि.इओना झोनारू(रशिया)[11] 6-2, 6-0;
एना सेडीशेवा(रशिया)वि.वि.नानारी कस्तुमी(जपान)[१०] ६-२, ६-३;
व्हॅन डी पीएर विकी(बेल्जीयम)[3] वि.वि.एलेना जमशेदी(डेन्मार्क)[13] 7-5, 6-2;
हुमेरा बहरमूस(भारत)[7] वि.वि.जेनिफर लुइखेम(भारत)[15]3-6, 6-2, 6-4.