पुणे, 26 नोव्हेंबर, 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12 वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात लक्ष्य त्रिपाठी, शौर्य बोर्हाडे, आर्यन बॅनर्जी, नील बोंद्रे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत लक्ष्य त्रिपाठीने प्रणव कोकरेचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. शुभ नाहाटा व शौर्य बोर्हाडे यांनी अनुक्रमे अद्वैत गुंड व अर्णव भावे यांचा 9-3 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. आर्यन बॅनर्जी याने स्वस्तिक मिश्रावर 9-5 असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी पात्रता फेरी:
लक्ष्य त्रिपाठी वि.वि.प्रणव कोकरे 9-0;
दिव्यांग रसगोत्रा वि.वि.विहान पंडित 9-7;
विवान मल्होत्रा वि.वि.सोहम खाडे 9-5;
शुभ नाहाटा वि.वि. अद्वैत गुंड 9-3;
शौर्य बोर्हाडे वि.वि.अर्णव भावे 9-3,
आर्यन बॅनर्जी वि.वि.स्वस्तिक मिश्रा 9-5;
पुरंजय कुतवाल वि.वि.विहान कांगतानी 9-2; ;
नील बोंद्रे वि.वि.आरव जैन 9-3.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू