पुण्यात कोयत्याने राडा घालणार्‍या म्होरक्याला अटक, बीडमधून अटक

पुणे, ०२/०१/२०२३ –  सिंहगड कॅम्पसमध्ये मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने दहशत माजवित पादचारी नागरिकांवर वार करण्याचा प्रयत्न करणार्‍या म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. हल्ल्याचा थरार २८ डिसेबरला रात्री दहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी दोन धाडसी अमलदारांनी घटनास्थळी धाव घेउन एका आरोपीला पोलिसी खाक्या दाखवित अटक केले होते.

करण अर्जुन दळवी (वय २१  रा. माणिकबाग, सिंहगड रोड)  असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी  अथर्व सुनिल लाडके वय २०  रा. सिंहगड रोड आंबेगाव बुद्रक यांनी फिर्याद दिली आहे.

अर्थव हे २८ डिसेंबरला मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी  आरोपी करण आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड याने परिसरात कोयत्याने दहशत माजविली. हातातील कोयता हवेत फिरवुन येणारे जाणार्‍या लोकांना धाक दाखवुन दुकानांचे शटरवर मारून राडा घातला. आरोपींनी गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने लोकांनी दुकाने बंद करुन सैरावैरे धाव घेतली.  त्यानंतर आरोपींनी अर्थववर वार करून मित्र  तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर कोयता फेकुन मारला होता. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच सिंहगड ठाण्याच्या दोन अमलदारांनी धाव घेत सुजित गायकवाड याला ताब्यात घेत बेदम चोप दिला.

पोलिस आल्याचे पाहताच आरोपी करण पसार झाला होता.  याप्रकरणी भारती विदयापीठ पोलीस त्याचा तपास घेत होते. तो बीडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि  धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांच्या पथकाने बीडमध्ये जाउन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कामगिरी उपायुक्त  स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट,  पोलीस निरीक्षक   विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता,   हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, राहुल तांबे यांनी केली.