शिरूर गोळीबार प्रकरणातील एन के साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

शिरूर, 7 मे 2021: शिरूर येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुलप याला कोथरूड येथील प्रसाद सुनील यादव याने राहण्यासाठी आश्रय दिला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारावर कारवाई करत, पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली.

या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता. गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रजारणी फरार आरोपीला आश्रय देण्यासाठी प्रसाद यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाई नुसार, बाबु उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप, वय 31 वर्षे , (रा.कामाठीपुरा,ता.शिरूर जि.पुणे) या आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कायद्याच्या (आयपीसी) कलम 307,341,141,142,143,147,148,504,506, 326,143,147,149,504,506,307,143,147,148,149,341,120(B),109, आर्म्स ऍक्ट 3,4,25,27 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii),3(4)याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, बाबु उर्फ परशुराम मन्छिद्र म्याकल, वय २१ वर्षे (रा. कामाठीपुरा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) या आरोपीवर पुधी गुन्हे दाखल आहेत.

1) हडपसर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 399,402, महाराष्ट्र पोलीस कायदयच्या कलम 37(1)(3),135, आर्म्स ऍक्टनुसार 3,4,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शुभम दत्तात्रय दळवी, वय २५ वर्षे (रा. प्रितमप्रकाश नगर, गणेश मंदिरामागे शिरूर ता. शिरूर, जि.पुणे) या आरोपीवर शिरूर आयपीसीच्या कलम 143,147,148,149,324,504,506, 307,324,232,504,506,34, 506,143,147,149 या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शुभम नरेश सिंग, वय २४ वर्षे (रा. गुजरमळा, माउली हॉस्पिटल समोर, शिरूर ता शिरूर जि.पुणे), अमोल हनुमंत करजुले, वय २४ वर्षे,( रा. बाबुरावनगर, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे),प्रसाद सुनील यादव, वय ३१ वर्षे (रा. तजवी भुसारी कॉलनी, यादव निवास बिल्डाग प्लॉट नं. १८२, फ्लॅट नं. ०९ कोथरुड पुणे) यांना ताबेत घेऊन वरील सर्व आरोपींना शिरूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरिक्षक सचिन काळे, पोलिस सब ईनस्पेकटर अमोल गोरे,रामेश्वर धोंडगे, एम.एस. देशमुख, सहायक फौजदार दिलीप जाधवर, दत्तात्रय जगताप,राजेंद्र थोरात,
पोलिस हवालदार मुकुंद आयचीत, सागर चंद्रशेखर , विद्याधर निचीत,प्रमोद नवले, मुकुंद कदम, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळेगुरू जाधव

पोलिस नाईक नितीन भोर,पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, पुनम गुंड, सुजाता कदम यांनी केली.