पुणे, १५ डिसेंबर २०२४ : विधानसभेचा निकाल लागून जवळपास एक महिना होत आलेला असताना नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे आज सकाळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची घोषणा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कोण मंत्री होणार कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डीच्चू मिळणार अशी चर्चा केली काही दिवस राहिली होती.l त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये पुणे शहराची लॉटरी लागली आहे. अनेक वर्षानंतर एकाच वेळेस दोन मंत्री पुण्याला मिळणार आहेत. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात निवड झाली आहे.
चंद्रकांत पाटील हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते 2014 पासून भाजपची सत्ता ज्यावेळेस राज्यात आली तेव्हा ते मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. तर माधुरी मिसाळ या 2009 पासून सलग चार वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या आहेत. मागच्या सरकारमध्येच मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार होती. मात्र अजित पवार यांचा महायुतीमध्ये प्रवेश झाल्यामुळे भाजपचे मंत्रिमंडळाची गणित बदलले आणि मिसळ यांना संधी मिळालेली नव्हती.
पुणे शहरातून पाटील आणि मिसाळ यांचे नाव पूर्वीपासून आघाडीवर होते. पण शहरात एकाच वेळेस दोघांना मंत्रिमंडळ स्थान मिळणार का अशी चर्चा सुरू होती. जर मिसाळ यांना मंत्री पद द्यायचे असेल तर चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास त्यावरून भलतीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे भाजपने या दोन्हीही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या दोघांना आता कोणते खाते मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर