मुंबई ७ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर, नेदरलँडच्या एरियन हार्टोनो यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकुच केली. तर, दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचे आव्हान संपुष्टात आले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हिने ब्राझीलच्या पाचव्या मानांकित लॉरा पिगोसीचा ६-३, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. संघर्षपूर्ण लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हिने फ्रान्सच्या अमनदिनी हासेचा २-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. एकेरीत पहिल्या पाचही मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दुहेरीत पहिल्या फेरीत स्लोवाकियाच्या दलीला जाकुपोवीच व अमेरिकेच्या सबिना सांतामारिया यांनी भारताच्या वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली या जोडीचा ६-३, ७-६(१) असा पराभव केला. ग्रीसच्या सापफो साकीलारेड्डी व ऑस्ट्रेलियाच्या ऑलीविया जान्द्रामुलीया या जोडीने रशियाच्या एकतेरिना माकारोव्हा व जपानच्या हिमेनो साकात्सुमे यांचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जॉर्जियाच्या नातेला जालामिडझे व हंगेरीच्या पन्ना उदवर्दी यांनी तैपेईच्या एन-शु लियांग व ची-यी साओ यांचा सुपरटायब्रेकमध्ये ४-६, ६-४, १०-७ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
एकेरीत मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीत सहजा यमलापल्ली हिने अव्वल मानांकित कायला डे वर सनसनाटी विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या फेरीत गुरुवारी सहजा हिच्यापुढे पॉलिना कुडेरमेटोव्हा हिचे आव्हान असणार
निकाल: एकेरी: दुसरी फेरी:
स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)वि.वि.लॉरा पिगोसी(ब्राझील)(५) ६-३, ६-३;
एरियन हार्टोनो(नेदरलँड)वि.वि.एरिना रोडीनोव्हा(ऑस्ट्रेलिया)(४) ६-४, ६-४;
दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.अमनदिनी हासे (फ्रांस)२-६, ६-४, ६-४;
दुहेरी: पहिली फेरी:
सापफो साकीलारेड्डी(ग्रीस)/ऑलीविया जान्द्रामुलीया(ऑस्ट्रेलिया)वि.वि.एकतेरिना माकारोव्हा(रशिया)/हिमेनो साकात्सुमे (जपान)६-२, ६-३;
दलीला जाकुपोवीच(स्लोवाकिया)/सबिना सांतामारिया(अमेरिका)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)/सहजा यमलापल्ली(भारत) ६-३, ७-६(१);
नातेला जालामिडझे(जॉर्जिया)/पन्ना उदवर्दी(हंगेरी)वि.वि.एन-शु लियांग(तैपेई)/ची-यी साओ(तैपेई)४-६, ६-४, १०-७;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय