पुणे, 8 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन आयटीए करंडक 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात लव परदेशी याने तर, मुलींच्या गटात जान्हवी सावंत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
खराडी येथील इंटेनसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित लव परदेशी याने तिसऱ्या मानांकित हर्ष नागवानीचा 5-3, 4-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित जान्हवी सावंतने अव्वल मानांकित वाण्या अगरवालचा 4-1, 4-1 असा सहज पराभव करून विजतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कपिला रिसॉर्टचे मालक नितीन ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व इंटेनसिटी टेनिस अकादमीचे अतुल देवधरे आणि स्पर्धा निरीक्षक तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी: 12 वर्षाखालील मुले:
लव परदेशी (5) वि.वि.हर्ष नागवानी(3)5-3, 4-1;
12 वर्षांखालील मुली:
जान्हवी सावंत(2)वि.वि.वाण्या अगरवाल(1)4-1, 4-1.

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश