बोव्हेलँडर फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅम सुरू

पुणे, 22 जानेवारी 2023 : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि नेदरलँड्सचे जागतिक हॉकी चॅम्पियन, फ्लोरिस जॅन बोवेलँडर यांच्या तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅमचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला.  बोव्हेलँडर फाऊंडेशनची संकल्पना असलेल्या, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुणे, पिंपरी, केडगाव आणि फलटण परिसरातील 24 हॉकी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आहे. हे प्रशिक्षक 12 शाळांमधील 600 हून अधिक विद्यार्थ्यांना (10 ते 14 वर्षे) हॉकीचे प्रशिक्षण देतील.

महाराष्ट्रातील ग्रासरूट हॉकी प्रोग्रॅमच्या पहिल्या टप्प्याला आर्यमंड इंडिया प्रा.लि., डच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि बोव्हेलँडर फाऊंडेशनचे  समर्थन मिळाले आहे .

बोवेलँडर फाऊंडेशनने बारामती, लासुर्णे आणि सातारा मध्ये  हॉकी प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे,ज्यामुळे 2025 पर्यंत 50 शाळा आणि  सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना हॉकीचा खेळ शिकवण्यात मदत होईल.

कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी, 24 हॉकी प्रशिक्षक पुण्यातील बोव्हेलँडर फाउंडेशनच्या 5 दिवसीय कोचिंग कोर्ससाठी एकत्र आले आहेत. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पुण्यातील संगम वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू आहे. सहभागी प्रशिक्षक नेदरलँडमधील तीन शीर्ष प्रशिक्षकांसह हॉकी कौशल्यांवर काम करत आहेत.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, प्रशिक्षकांनी आज सकाळी पुण्यातील आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये 75 मुलांसह बोव्हेलँडर फाऊंडेशन किड्स हॉकी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 बोवेलँडर 2015 पासून बोव्हेलँडर फाऊंडेशनचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी भारतात अनेक हॉकी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत.

बोव्हेलँडर फाऊंडेशनच्या कार्याच्या काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

 खुंटी, झारखंड येथे ग्रासरुट्स उपक्रम 77 ठिकाणी सुरू आहे ; या साप्ताहिक उपक्रमात 40 प्रशिक्षक 3100 मुलांना सहभागी करून घेतात  -गेल्या पाच वर्षांत, 10.000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उपक्रम पोहोचला आहे . स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करत या कार्यक्रमाशी आरोग्य, बाल हक्क आणि आर्थिक साक्षरता यासारखे शैक्षणिक कार्यक्रम जोडले गेले.

 

 

प्रादेशिक विकास केंद्र : सिमडेगामध्ये अतिरिक्त प्रशिक्षणासाठी 90 प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.  येथून विविध हॉकी अकादमींसाठी मुलांची निवड करण्यात आली.

जमशेदपूर येथील नवल टाटा हॉकी अकादमी.  स्थापना 2017. सध्या 40 मुलांसह.  या वर्षाच्या अखेरीस मुलीही या अकादमीत सहभागी होतील.

 भुवनेश्वरमधील नवल टाटा हॉकी अकादमी.  त्याची सुरुवात 2019 मध्ये 30 मुलींसह झाली;  नंतर, मुले सामील झाली.  हे सेंटर ऑफ एक्सलन्स कलिंगा स्टेडियममध्ये आहे.  या ठिकाणी आता पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषकाचे आयोजन करते.