गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे दि.1: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे पुणे जिल्हा दोऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दिनांक 2 जुलै 2021 रोजी सकाळी 7.45 वाजता मोटारीने पुणे येथून पोलीस अधिक्षक कार्यालय, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणेकडे प्रयाण. 8 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे येथे आगमन व पोलीस कल्याण निधी अंतर्गत पेट्रोल पंपाचे उद्घाटन समारंभ. 8.45 वाजता मोटारीने पोलीस अधिक्षक कार्यालय, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे येथून वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी बु., ता.हवेली, जि.पुणेकडे प्रयाण. 9.15 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी बु., ता.हवेली जि.पुणे येथे आगमन व राखीव.

सायंकाळी 4 वाजता मोटारीने वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी बु, ता.हवेली, जि.पुणे येथून मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे आगमन व राखीव. रात्री मंचर येथे मुक्काम.