September 12, 2025

महाराष्ट्र: राज्यात उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार….

पुणे, २७/०५/२०२५: राज्यात पुणे,मुंबई,सोलापूर सह इतर शहरात मान्सून दाखल झालं असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.राज्यात होत असलेल्या या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे.अस असताना आत्ता उद्या पासून पावसाचा जोर हा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागांचे हवामान तज्ञ एस.डी.सानप यांनी दिली.

यावेळी हवामान विभागांचे हवामान तज्ञ एस.डी.सानप म्हणाले की राज्यातील विचार केला तर कोकण परिसरात आज चांगला पाऊस झाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं असून येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर आज पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेज अलर्ट देण्यात आलं आहे.आणि कोल्हापूर येथील घाट माथ्यावर देखील रेट अलर्ट देण्यात आलं आहे.पुणे मुंबई येथे देखील आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे.सध्या जे काही आज आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे त्याची तीव्रता उद्यापासून कमी होणार आहे आणि हळूहळू राज्यात देखील पावसाचा प्रमाण कमी होणार असल्याचं यावेळी सानप म्हणाले.

राज्यात या मुसळधार पावसामुळे जवळपास ३४ हजार हेक्टर अस शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.तर काही शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीच संकट आलं आहे.अस असताना शेतकऱ्यांनी पेरणी साठी घाई करू नये तसेच जिथ जास्त पाऊस झाल आहे तिथं वाफसा तयार झाल्यास पेरणी करावी तसेच कृषी विभागाकडून जी काही सूचना येतील त्या सूचनांचा पालन शेतकऱ्यांनी करावं अस आवाहन देखील यावेळी हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.