सहकार मंत्रालयाचा फायदा महाराष्ट्राला होईल: देवेंद्र फडणवीस

पुणे,०९/०७/२०२१: नरेंद्र मोदी सरकारने साखर खरेदीसाठी किमन अधारभूत किंमत देली, कारखान्यांना पॅकेज दिले, इथेनॉलचे धोरण आणले त्यामुळे मरायला टेकलेली साखर कारखानदारी जिवंत राहिली आहे. केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन केल्याने या क्षेत्रात आणखी चांगले काम करता येईल व त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल. पण अमित शहा सहकारमंत्री झाल्याने कोणाला कापरे भरत असतील तर त्याला आम्ही काही करू शकत नाही, असा टोला विधान सभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लावला.

 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. केंद्र सराकरने एनसीबीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपेय राज्य सरकारला दिले गेले आहेत. दुध संघ, साखर कारखाने, सुत गिरण्यांना केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. इतर वर्ष सहकार खाते केंद्र सरकारमुळे मरत आहे अशी टीका करत होते. पण आता ७० वर्षात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. तर केंद्र का करत आहे असा प्रश्‍न विचारत आहे. सहकार मंत्रालय स्थापन केल्याने संपूर्ण देशात महाराष्ट्राला जास्त फायदा होईल. अतिम शहा हे राजकारणात येण्यापूर्वी सहाकरात काम करत होते. गुजरातमधील सहकारातील एक प्रमुख नाव म्हणजे अमीत शहा होते, म्हणून ते मंत्री झाले आहेत. पण त्यांच्याकडे हे खाते गेल्यानंतर काही जणांना कापरे भरतात त्यांना आम्ही काही करू शकत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

हरी नरके राष्ट्रवादीचे प्रवक्ते ?

ओबीसी आरक्षणावर हरी नरके फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘हरी नरके हे विचारवंत आहेत की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत? हे कळत नाही. ओबीसी आरक्षणावर त्यांनी जरूर टीका करावी, पण ते एकतर्फी बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्व देत नाही. इंपेरिअल डेटा तयार करण्यासाठी ४ महिने लागतात. पण या राज्य सरकारला करायचे नाही, केवळ आरक्षणाच्या नावाने टाईमपास करायचा आहे. त्यामुळेच आमचे सरकार आले तर तीन महिन्यात मी आरक्षण देऊ शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले.