महाराष्ट्र इलेव्हन, खेलो इंडिया सेंटर कोल्हापूर अंतिम लढत

पुणे, 14/11/2021- महाराष्ट्र इलेव्हन आणि खेलो इंडिया सेंटर,कोल्हापूर यांनी सफाईदार विजयासह तिसऱ्या एसएनबीपी महिला राज्य-स्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

चिखली येथील एसएनबीपी संकुलातील डॉ. दशरथ हॉकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत खेलो इंडियादुसऱ्य सेंदर संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचे आव्हान ६-० असे किरकोळीत मोडून काढले. महाराष्ट्र इलेव्हन संघाने नाशिक अॅकॅडमीचा ११-० असा धुव्वा उडवला.

महाराष्ट्र इलेव्हन संघाच्या विजयाने पूजा शेंडगे हिने १ल्या, ३९व्या आणि ४०व्या, तर अश्विनी काळेकर हिने ८व्या, १४व्या आणि १८व्या मिनिटाला गोल करून शानदार हॅटट्रिक नोंदवली. उत्कर्षा काळे हिने (दुसऱ्या आणि १५व्या) दोन, तर काजल आटपाटकर (१३वे), सुकन्या धारवे (२९वे) आणि मनश्री शेडगे (३५वे मिनिट) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या खेलो इंडिया सेंटर संघाने यजमान एसएनबीपी संघाचे आव्हान संपुष्टात आणताना परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्याकडून सानिका माने हिने हॅटट्रिक नोंदवताना ९,३७ आणि ४०व्या मिनिटाला गोल केले. कृष्णा माने (१४वे), समिक्षा शेगुंन्शी (३१वे) आणि सावित्री बोर्गल्ली (४२वे मिनिट) यांनी गोल करून संघाचे विजयाधिक्य वाढवले.

निकाल –
महाराष्ट्र इलेव्हन ११ (पुजा शेडगे १ले, ३९वे, ४०वे, उत्कर्ष काळे २रे, १५वे, अश्विनी काळेकर ८वे, १४वे, १८वे, काजल आटपाटकर १३वे, सुकन्या धावरे २९वे, मनश्री शेडगे ३५वे मिनिट) वि.वि. नाशिक अॅकॅडमी ०

खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर ६ (सानिका माने ९वे, ३७वे, ४०वे, कृष्णा माने १४वे, समिक्षा सेगुन्शी ३१वे, सावित्री बोर्गली ४२वे मिनिट) वि. वि. एसएनबीपी अॅकॅडमी, पुणे ०

अंतिम फेरी – महाराष्ट्र इलेव्हन वि. खेलो इंडिया, कोल्हापूर (दु. १२ वाजता)

तिसऱ्या क्रमांकासाठी – एसएनबीपी अॅकॅडमी वि. नाशि अॅकॅडमी (दु. १.३०वा.)

केंद्र – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी