October 27, 2025

रास्तापेठ येथे महावितरणचा ‘हिरकणी कक्ष’

पुणे, दि. १ जुलै, २०२५- रास्तापेठ येथील महावितरणच्या परिमंडल कार्यालयात स्तनता माता महिला कर्मचाऱ्यांसाठी तसेच अभ्यागत महिला मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्याहस्ते सोमवारी (३० जून) दुपारी या हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

रास्तापेठ येथे महावितरणचे परिमंडल कार्यालय तसेच त्यांतर्गत येणारी इतरही अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे येथे महिला कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागत महिलांची संख्याही मोठी आहे. महिलांची गरज व अडचण लक्षात घेऊन महावितरणने हिरकणी कक्षाची सुरुवात केली आहे. या कक्षात आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता सुनील काकडे यांचेसह रास्तापेठचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, संजीव नेहते (स्थापत्य), कार्यकारी अभियंते नितिन थिटे, प्रवीण पंचमुख (स्था.), अति. कार्यकारी अभियंता अजय सूळ यांचेसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.