सिंहगड रोडवरील गॅस पाईपलाईनच्या आगीशी महावितरणचा संबंध नाही

पुणे, दि. १३ जानेवारी २०२३: सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ सुरू असलेल्या खोदकामामुळे एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनमध्ये काल (दि. १२) मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीशी कोणत्याही प्रकाराचा संबंध नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राजाराम पुलाजवळ महावितरणकडून भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदकाम करण्यात आलेले नाही किंवा त्यासंबंधीचे महावितरणकडून कोणालाही कंत्राट देण्यात आलेले नाही.