भीमा कोरेगाव विकास निधी लवकर उपलब्ध करा – राहूल भंडारे यांची मागणी

पुणे, २२/११/२०२२: गतवर्षी पुणे महानगर पालिका मुख्य सभेत सभासद राहूल भंडारे यांनी भीमा कोरेगाव विजयी रणस्तंभ विकास कामासाठी एक कोटिंची मागणी केली असता ती एकमताने मान्य करण्यात आली होती. सदर ठिकाणी पाहणी करून विकास आराखडा तयार करण्यात आला होता.परंतू मनपा नगरसेवक कार्यकाळ मार्च पासून संपलेला आहे. राज्य शासन मार्फत कामकाज सुरू आहे. त्यामुळे हा निधी लवकर उपलब्ध करून देण्यासाठी भंडारे यांनी पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

०१ जानेवारी पूर्व सदर ठिकाणी विकास काम होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. माहिती घेऊन योग्य ती मदत करणार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.