पुण्यात मॉल, अभ्यासिका सोमवारपासून उघडण्यास परवानगी : अजित पवार

पुणे,११जून२०२१: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती चा आढावा घेतल्या नंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुण्यातील कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून आल्यामुळे पुण्यात नियम शिथिल करण्यात आले होते पण आज नव्याने मुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील नागरिकांना दिलास देणारी घोषणा केल्या आहेत.

अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत घोषणा केली, सोमवारपासून शॉपिंग मॉल्स उघडले जातील यामुळें पुण्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. याचा फायदा जनतेला होणारच, तसेच यामुळे व्यापरीवर्ग देखील सुखावनार आहे.

अजित पवारांनी असे देखील सांगितले पुण्यातील सर्व दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे .हॉटेल रेस्टॉरंट देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या गौरसोयी लक्षात घेता वाचनालय व अभ्यासिका सुद्धा सोमवार पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.