अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत,तरूणाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

पुणे , १८ ऑगस्ट २०२१ :- शहरातील एका तरूणाने पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेत आतमध्ये धाव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे.


आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरेश पिंगळे या तरूणाने पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आतमध्ये प्रवेश केला. स्वतः पेटवून घेत तरूण आयुक्तालयात आल्यानंतर सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरेशच्या अंगावर चादर टाकून आग विझविली. त्याला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खडकी पोलीस ठाण्यातंर्गत पोलीस अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप करीत संबंधित तरूणाने हाताची नस कापून ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.