पुणे, 19 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत अंतिम फेरीत भार्गव पाठक(नाबाद 65) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने सेलर्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले. जॅग्वार्स संघाने या स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना फोर ओक्स सेलर्स संघाने 6षटकात 3बाद 87धावा केल्या. यात रौनक ढोले पाटीलने 18चेंडूत 5चौकार व 3षटकाराच्या मदतीने 51धावा, तारिक परवानीने 16चेंडूत 3चौकार व 1षटकाराच्या साहाय्याने 30 धावा केल्या. जॅग्वार्सकडून सौरभ सिंग(1-6), आकाश दलवाणी(1-13) याने सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने 5.2षटकात 1बाद 90धावा करुन पुर्ण केले. यात भार्गव पाठकने 19चेंडूत 7चौकार व 5षटकारासह नाबाद 65 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला उमेश पिल्लेने 13चेंडूत 2चौकार व 1षटकारासह नाबाद 22 धावा काढून साथ दिली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल हांडा , पुना क्लबचे उपाध्यक्ष आणि पीसीपीएलचे अध्यक्ष गौरव गढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे समिती सदस्य मनीष मेहता, शैलेश रांका, नीव नवानी, अमेय कुलकर्णी, तुषार आसवानी, अमित परमार, वीणा मनसुखानी, अक्षय चंदीरमानी, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक) आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
सेलर्स: 6षटकात 3बाद 87धावा(रौनक ढोले पाटील 51(18,5×4,3×6), तारिक 30(16,3×4,1×6), सौरभ सिंग 1-6, आकाश दलवाणी 1-13) पराभुत वि. मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स: 5.2षटकात 1बाद 90धावा(भार्गव पाठक नाबाद 65(19,7×4,5×6), उमेश पिल्ले नाबाद 22(13,2×4,1×6), अमिताभ अगरवाल 1-12); सामनावीर – भार्गव पाठक; मनप्रीत जीजीज अँड जॅग्वार्स संघ 7 गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: भार्गव पाठक (333धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: अरुण खट्टर(6विकेट)
मालिकावीर: रौनक ढोले पाटील (377धावा व 5विकेट);
सर्वोत्कृष्ट षटकार: पुनीत सामंत;
सर्वोत्कृष्ट झेल: अमिताभ अगरवाल;
बेस्ट स्पोर्टीग खेळाडू: डॉ. श्रीवास्तव
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: प्रतिश थडानी;
फेअर प्ले टीम:वुल्व्हस;
सर्वोत्कृष्टक्षेत्ररक्षक: भार्गव पाठक;
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू: रौनक ढोले पाटील
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय