मारुती सुझुकी एर्टीगा नेक्स्ट जनरेशन चे पुण्यात आगमन

पुणे, 12/5/2022: मारुती सुझुकीची बहुप्रतीक्षित एर्टीगा नेक्स्ट जनरेशन या चारचाकी वाहनाचे पुण्यात आगमन झाले आहे. पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेनापती बापट रोडवरील महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह येथे नुकताच या वाहनाचा अनावरण सोहळा पार पडला.

 

यावेळी महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह प्रा. लि.चे संचालक नितीन सदाशिव सातव, मारुती सुझूकीचे मंगेश राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन चांदणे, ट्रू व्हॅल्यूचे महाव्यवस्थापक नितीन गिते, योगेश देशपांडे, जैन मोटर्सचे अतुल जैन, योगेश अरुळकर व कर्मचारी उपस्थित होते.

 

एर्टीगा नेक्स्ट जनरेशन या गाडीला बाजारपेठेत मोठी मागणी असून पुण्यात पहिल्यांदाच महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह येथे ही गाडी बघायला मिळणार आहे. साधारण आठ महिने प्रतिक्षा काळ असलेल्या या गाडीची टेस्ट ड्राइव नागरिकांना महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह येथे घेता येऊ शकणार आहे.

 

एर्टीगामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून ७ प्रवाशांसाठी ही गाडी उत्तम पर्याय आहे. पेट्रोल आणि सीएनजी मध्ये ही गाडी उपलब्ध असून वाहन प्रेमींना या गाडीची तूर्तास तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.