पुणे, २९ एप्रिल,२०२४ : पुणे लोकसभेचे एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार पदयात्रेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही प्रचार पदयात्रा पुणे शहरातील मेनरोड पासून पारस बिल्डिंग,भीम संघटना, भीमटोला चौक, खड्डा वस्ती, दुशकर वस्ती, वस्ती रॅली, राजगुरू चौक, गुंजी वस्ती, ताडीवाला रोड या मार्गांवरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी एमआयएम उमेदवार अनिस सुंडके यांच्यासह एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, युवक अध्यक्ष शाहीद शेख, हुसेन शेख, शोएब शेख, अतिक मन्सुरी आदी उपस्थित होते.
यावेळी एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले कि, “ही लढाई संघर्षाची आहे. एमआयएम पक्ष मुस्लिम समाजाच्या मागे ठामपणे राहतो पण त्याहून हा पक्ष सर्व घटक पक्षांना सोबत घेण्याबाबत कायमच आग्रही असतो. एमआयएम हा पक्ष संघर्षातून उभा राहिलेला पक्ष असून कायम संघर्ष करणाऱ्यांच्या मागे उभा आहे. कष्टकरी समाज असलेल्या प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी उभा असलेला आमचा पक्ष आहे. त्यामुळेच पुणे शहरात प्रस्थापित पक्षाचे उमेदवार असले तरी मी संघर्षातून घडलेला कार्यकर्ता असून मला सामान्य जनतेच्या व्यथा जवळून माहित आहेत.”

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार