नोकरीच्या शोधात अल्पवयीन मुलांनी गाठले पुणे 

पुणे, २४ आॅगस्ट २०२२: घरच्यांना न सांगता नोकरीच्या शोधात दिल्लीवरून पुण्यात पळून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या मुलींना मुंडव्यातील बाल सुधार घरात ठेवण्यात आले आहे.समुली गायब झाल्याने चिंतातूर झालेल्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

शितल सत्येंद्र कुमार यादव (वय- 16 ) निभा कुमारी नरेश (वय 17) अलिषा परविन मोहम्मद अफजल खान (वय 13, सर्व राहणार नोएडा सेक्टर 27 अट्टा मार्केट, चक्की गल्ली, नोएडा).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ९.३०च्या दरम्यान राजधानी हॉटेल, नरपत गिरी चौक, सोमवार पेठ येथील मॅनेजर सुधाकर कमलाकर डांगे यांनी फोन द्वारे पोलीस स्टेशनला माहिती दिली की, तीन अल्पवयीन मुली रूम मागण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असून त्यांच्यासोबत कोणीही वयस्कर व्यक्ती नाही. ही माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक रणदिवे व पथक हे राजधानी हॉटेल या ठिकाणी पोहोचले असता, तेथे तीन अल्पवयीन मुली आढळून आल्या. त्यांना महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यास आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्या नोकरीच्या शोधामध्ये पुणे येथे आज रोजी सायंकाळी 9:15 वाजण्याच्या दरम्यान पुणे स्टेशन येथे दिल्ली ते पुणे असा प्रवास ट्रेन ने पोहोचलेले आहेत.

या मुलींकडे अधिक चौकशी केली असता, त्या घरामध्ये कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून आल्याचे माहिती मिळाली. या बाबत पुणे कंट्रोल रूम येथून दिल्ली पोलीस कंट्रोल रूम यांचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याद्वारे सेक्टर 20 पोलीस स्टेशन ठाणे नोएडा, येथील सब इन्स्पेक्टर नितीन जावला यांना फोन करून माहिती दिली असता, त्यांनी सदरच्या तिन्ही मुली आज दि. 23/08/2022 रोजी सकाळ पासून हरवल्या बाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. अशी माहिती दिली.

 

तसेच सदर मुलगी शितल हिचा भाऊ हिमांशू यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. सदर तिन्ही मुलींची ससून रुग्णालय येथे वैद्यकीय व कोविडची तपासणी करून सुरक्षिततेचे कामी बाल सुधारगृह मुंढवा येथे महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सरकारी वाहनाने पाठवण्यात आलेले आहे. तसेच बाल न्याय मंडळ समिती येरवडा पुणे चे अधिकारी परेश सर यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांना त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसा अहवाल त्यांना पाठवण्याची तजविज ठेवण्यात आलेली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी नाहीत माहिती देण्यात आली आहे असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.