September 24, 2025

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत मिसाकी मत्सुदा, फुना कोजाकी, एकतेरिना याशिना यांची आगेकूच

नवी मुंबई, 26 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत मिसाकी मत्सुदा, फुना कोजाकी, एकतेरिना याशिना यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. दुहेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी यांनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत जपानच्या मिसाकी मत्सुदा हिने सातव्या मानांकित रशियाच्या क्सेनिया झायत्सेवाचा 6-3, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. जपानच्या फुना कोजाकी हिने भारताच्या झील देसाईचे आव्हन 6-1, 6-7(4), 6-2 असे संपुष्टात आणले. रशियाच्या एकतेरिना याशिनाने हर्षाली मांडवकरचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला. ग्रीसच्या चौथ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीने भारताच्या सुहिता मारुरीचा 6-3, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

दुहेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी या जोडीने कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवा व लिथुनियाच्या जस्टिना मिकुलसाईते या अव्वल मानांकित जोडीचा 7-6(5), 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा या जोडीने चौथ्या मानांकित एकतेरिना मक्लाकोवा व एकतेरिना याशिना जोडीचा 6-4, 3-6, 10-5 असा पराभव केला. भारताच्या तिसऱ्या मानांकित ऋतुजा भोसले व प्रार्थना ठोंबरे यांनी एकतेरिना काझिनोवा व आकांक्षा नित्तूरे( यांचा 6-1, 6-3 असा पराभव केला. भारताच्या झील देसाईने रशियाच्या क्सेनिया झायत्सेवाच्या साथीत नानारी कात्सुमी व होनोका कोबायाशी यांचा 6-1, 4-6, 10-2 असा पराभव करून आगेकूच केली.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:
मिसाकी मत्सुदा (जपान)वि.वि.क्सेनिया झायत्सेवा(रशिया)[7] 6-3, 6-4;
फुना कोजाकी(जपान)वि.वि.झील देसाई (भारत)6-1, 6-7(4), 6-2;
एकतेरिना याशिना (रशिया) वि.वि.हर्षाली मांडवकर(भारत) 6-1, 6-1;
सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) [4] वि.वि.सुहिता मारुरी (भारत)6-3, 7-5;
नाहो सातो (जपान) वि.वि.एना सेडीशेवा(रशिया)6-4, 2-0;

दुहेरी:
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती(भारत)/वैदेही चौधरी(भारत)वि.वि.झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान)/जस्टिना मिकुलसाईते(लिथुनिया)[1]7-6(5), 6-2;
बीट्रिस गुमुल्या(इंडोनेशिया)/अकिको ओमाई(जपान)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)/सहजा यमलापल्ली(भारत) 6-1, 2-6, 14-12;
कॅमिला बारटन(लात्विया)/एकतेरिना मकारोवा(रशिया)वि.वि.स्नेहल माने (भारत)/मधुरिमा सावंत(भारत)6-0, 6-2;
हिरोमी आबे (जपान)/साकी इमामुरा(जपान)वि.वि. एकतेरिना मक्लाकोवा /एकतेरिना याशिना(रशिया)[4]6-4, 3-6, 10-5;
ऋतुजा भोसले(भारत)[3] /प्रार्थना ठोंबरे(भारत)वि.वि.एकतेरिना काझिनोवा /आकांक्षा नित्तूरे(भारत)6-1, 6-3;
झील देसाई (भारत)/ क्सेनिया झायत्सेवा(रशिया) वि.वि.नानारी कात्सुमी (जपान)/होनोका कोबायाशी(जपान) 6-1, 4-6, 10-2;
डायना मार्सिचेविका(लात्विया)[2] /सॅपफो साकेलारिडी (ग्रीस)वि.वि.कुंडली मजगईने(भारत)/सौम्या विज(भारत)6-1, 6-2.