पुणे, १ नोव्हेंबर २०२२: नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सध्याचा रस्ता अपुरा पडत असल्याने आता थेट बीआरटी मार्ग खासगी वाहनांसाठी खुला करा अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
येरवडा ते खराडी पर्यंतच्या मार्गावर असलेल्या बीआरटी प्रकल्पामुळे या वाहतुक कोंडीत आणखी भर पडत असून सातत्याने अपघात होत आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांची सुटका व्हावी यासाठी तातडीने बीआरटीच्या लेन काढून टाकण्यात यावी. जर लगेचच हा मार्ग उखडून टाकणे प्रशासनासाठी शक्य नसेल तर बीआरटी मार्गातूनही खासगी वाहनांना प्रवेश देण्यात यावा, अशी भूमिका आमदार टिंगरे यांनी घेतली आहे.
आमदार टिंगरे म्हणाले, ” नगर रस्त्यावर रोज मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. बीआरटी मार्गामुळे अडचण होत असल्याने हा मार्ग काढून टाकून ही जागा खासगी वाहनांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी आमची भूमिका आहे.
जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यासंबंधीची मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. यावेळी आयुक्तांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविन्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू