छत्रपती संभाजी नगर, दि 16 जानेवारी 2024: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंद्रे याने तर, मुलींच्या गटात रीत अरोरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित स्मित उंद्रेने सातव्या मानांकित संजय कुमारचा 6-3, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळवणाऱ्या औरंगाबादच्या शिवराज जाधवने नमन बोराहचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. अव्वल मानांकित शौनक सुवर्णा याने जय गायकवाडछा 6-3, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात रीत अरोरा हिने सातव्या मानांकित जान्हवी तमीनीडीचा 6-4, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. तिसऱ्या मानांकित शिबानी गुप्तेने अनन्या पाटीलचे आव्हान 6-0, 6-0 असे मोडीत काढले. अव्वल मानांकित आहाना ए. हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दीप्ती व्यंकटेशनचा 6-4, 7-6(3) असा पराभव केला.
निकाल: मुले: दुसरी फेरी: मुख्य ड्रॉ:
शौनक सुवर्ण(भारत)[1]वि.वि.जय गायकवाड (भारत)6-3, 6-2;
दैविक कालवकुंता(भारत) वि.वि.विश्वास चंद्रशेखरन(अमेरिका)6-3, 4-6, 7-5;
ऋन्मान महेश एस ( भारत)वि.वि. माधव दधीच(भारत)6-4, 7-5;
स्मित उंद्रे(भारत)वि.वि. संजय कुमार(भारत) [7]6-3, 6-1;
शिवराज जाधव(भारत)वि.वि.नमन बोराह (भारत)6-1, 6-0;
मनन राय (भारत) [8]वि.वि. अधृत गौतम (भारत)6-3, 6-4;
ईशान येडलापल्ली(भारत) वि.वि.नीरज जोर्वेकर(भारत)6-2, 6-4;
वरद उंद्रे ( भारत) [5] वि.वि.हेरंबा पोहाणे(भारत)6-1, 7-6(3);
मुली:
धनवी कांजीतंडा( भारत)वि.वि. संयुक्त कृष्णन(भारत) 7-5, 2-6, 6-4;
रीत अरोरा (भारत)वि.वि. जान्हवी तमीनीडी(भारत) [7] 6-4, 6-3;
शिबानी गुप्ते(भारत)[3]वि.वि.अनन्या पाटील(भारत)6-0, 6-0;
आहाना ए. (भारत)[1]वि.वि.दीप्ती व्यंकटेशन (भारत)6-4, 7-6(3);
वृंदिका राजपूत (IND) [5]वि.वि.प्रांजली पांडुरे (भारत)6-1, 6-1;
अहाना दास (भारत)[8]वि.वि.मायरा शेख (भारत)
श्रीनिती चौधरी (भारत)[2]वि.वि.मेगलाई प्रकाश (भारत)6-0, 6-0;
कार्तिका पद्मकुमार(भारत) [4]वि.वि. आयेशा बागला (भारत)6-0, 6-0;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय