मोदी सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार: रमेश बागवे

पुणे, ७/०६/२०२१: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती भरमसाट वाढविल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नाना पटोले यांच्या आदेशावरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील ३६ ठिकाणी निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, चंदूशेठ कदम, लता राजगुरू, अजित दरेकर, मनीष आनंद, चाँदबी नदाफ, रफिक शेख व इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ३६ ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

यावेळी बी. टी. कवडे रोड येथील भारत पेट्रोलियम पंप येथे बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रात युपीए चे सरकार असताना आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाट वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर युपीए सरकारने परिणाम होऊ दिला नाही. परंतु मोदी सरकारने भाववाढ करून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला दिसत नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रूपये नफा मिळविला आहे. गेल्या मे २०२० पासून गॅसवरची सबसीडी बंद केली आहे. आज गॅसची किंमत ही ९०० रू. झाली आहे त्यामुळे गृहिणींना घर चालविणे अवघड झाले आहे. जेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढतात त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही होतो आणि त्यांचेही भाव वाढतात. सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहे. हे सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार आहे. मोदी सरकारने त्वरीत पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी केले पाहिजे अन्यथा जनतेच्या हितासाठी पुढच्या काळात काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार.’’

अलका टॉकिज येथील कुलकर्णी पेट्रोल पंप येथे निदर्शन करताना माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, ‘‘मोदी सरकारने पेट्रोलचे दर १०० रूपये लिटर करून एक नविन पायंडा पाडला आहे. निवडणुकीचा प्रचार करताना मोदी म्हणाले की, मी प्रत्येक गरीबाच्या डोळ्यात असलेले अश्रु पुसून त्यांना अच्छे दिन आणणार. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही, सामन्य जनतेच्या डोळ्यातून अजून अश्रू वाहतच आहे. मोदी सरकारला जनतेच्या प्रश्नांची काळजी नाही विकासाच्या नावाखाली वायफट खर्च करून जनतेची दिशाभूल करीत आहे. जनता लवकरच मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’’

या निदर्शनामध्ये वीरेंद्र किराड, शिवाजी बांगर, जॉन पॉल, शिवा मंत्री, राजेंद्र शिरसाट, कैलास गाकवाड, मिलिंद काची, नीता रजपूत, हाजी नदाफ, रजनी त्रिभुवन, श्रीरंग पुरंदरे,  चैतन्य पुरंदरे, भगवान धुमाळ, ॲड.नितीन परतानी, प्रविण करपे, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, विजय खळदकर, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, साहिल केदारी, राजेंद्र भुतडा, अजिज सैय्यद, रमेश सकट, शोएब इनामदार, रमेश राऊत, शैलेंद्र नलावडे, शाबीर खान, बाळासाहेब अमराळे, सुजित यादव, उमेश कंधारे, विल्सन चंदेलवाल, मेहबुब नादाफ, सुरेखा खंडागळे, मीरा शिंदे, सुंदरा ओव्हाळ, रमा भोसले, ज्ञानेश्र्वर मोझे, नागेश भालेराव, किशोर मारणे, संदिप मोकाटे, भगवान कडू, शारदा वीर, युवराज मदगे, हरजितसिंग अरोरा, विजय वारभुवन, राजेश शिंदे, रवि पाटोळे, विनय ढेरे, हेमंत राजभोज, दत्ता जाधव, रोहित धेंडे, प्रकाश आरणे, दिपक ओव्हाळ, भरत सुराणा, वैशाली रेड्डी, सेल्वराज ॲन्थोनी, बाबा सय्यद, संजय कवडे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेव्हिड, बाळासाहेब मारणे, सुनिल पंडित, सईदभाई, सुरेश कांबळे, बंडू शेंडगे, राहुल तायडे, रमेश राऊत, नारायण पाटोळे, गुलाम खान, ॲड. फैय्याज शेख, संजय मोरे, राजु ठोंबरे, चेतन आगरवाल आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.