मोकातील फरारी सराईताला चेंबरमधून अटक, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पुणे, दि. २ जून २०२१: शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खूनाचा प्रयत्न, वाहनचोरी करणाया आणि श्याम दाभाडे टोळीतील सराईताला खंडणी विरोधी पथकाने चेंबूरमधून अटक केले. योगेश उर्फ पप्प्या प्रकाश दाभाडे (वय २४ रा. चेंबूर मुंबई, मूळ- तळेगाव दाभाडे ) असे अटक केलेल्यचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध २०१९ मध्ये मोकानुसार कारवाई केल्यानंतर तो फरार झाला होता.

सराईत श्याम दाभाडे टोळीचा साथीदार आणि मोकातील फरारी योगेश उर्पâ पप्या चेंबूरमध्ये असल्याची माहिती पोलीस अमंलदार नितीन रावळ आणि पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

त्याच्याविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि वाहन चोरीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, एपीआय संदीप बुवा, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, रमेश चौधर, अमर पवार, गजानन सोनवलकर, विजय कांबळे, हनुमंत कांदे, पिराजी बेले, संजय भापकर, मधूकर तूपसुंदर, संदेश निकाळजे, ऋषिकेश महल्ले, हेमा ढेबे, अश्विनी केकान यांच्या पथकाने केली.