छत्रपती संभाजी नगर, दि 13 जानेवारी 2024: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातून मुले व मुली दोन्ही गटात 120 हुन अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे 14 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेत मुलींच्या गटात ओडिशाच्या अहाना हिला, तर मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणित रेड्डी याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, एमएसएलटीएच्या वतीने 14वर्षाखालील गटात पहिल्यांदाच आशियाई मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी संधी मिळेल.
“मराठवाड्यात अधिकधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघुन आम्हांला खूप आनंद झाला आहे”. औरंगाबाद येथे नुकतीच 14 वर्षाखालील एआयटीए टेनिस स्पर्धा, 16 वर्षाखालील गटातील आशियाई मानांकन टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. एकापाठोपाठ आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धांमुळे औरंगाबाद मधील खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळवण्याची संधी मिळणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
वर्षा जैन यांनी टेनिस उपक्रमांना दिलेल्या अतुलनीय पठिंब्याबद्दल तसेच, छत्रपती संभाजी नगर मध्येच नव्हे तर बीड, परभणी, नांदेड आणि जालना या ठिकाणीही या खेळाच्या प्रचारासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अय्यर यांनी नमूद केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 200 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 133 एटीएफ गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धा संचालक वर्षा जैन असणार असून या स्पर्धेसाठी वैशाली शेकटकर यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., प्रवीण प्रसाद आणि प्रविण गायसमुद्रे यांची या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये संजय दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आणि एमएसएलटीए कौन्सिल सदस्य अली पंजवानी आणि आशुतोष मिश्रा यांचा समावेश आहे.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय