एमएसएलटीए – फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत क्वालिफायर सक्षम भन्साळीचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे,दि.17 ऑक्टोबर 2022: फर्ग्युसन कॉलेज यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या क्वालिफायर सक्षम भन्साळी याने आठव्या मानांकित आपलाच राज्य सहकारी बाला वीर सिंगचा 6-4, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
 
 फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात  चुरशीच्या लढतीत अनुज तशिलदार याने देवेश वधईचा 6-2, 0-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. अव्वल मानांकित लक्ष गुजराथी याने यशराज अग्रवालचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या ओंकार शिंदे याने तामिळनाडूच्या अर्णव हरिशंकरचा टायब्रेकमध्ये 7-6(8), 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या क्षिरीन वाकलकर, अभिलिप्सा मल्लिक, रिशीता पाटील, तामिळनाडूच्या सहाना कमलाकन्नन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुली:
क्षिरीन वाकलकर(महा)(1) वि.वि.अधीरा गुप्ता(महा) 6-1, 6-0;
सहाना कमलाकन्नन (तामिळनाडू) वि.वि.श्रावी देवरे (महा) 7-5, 6-2;
अभिलिप्सा मल्लिक(महा)(3) वि.वि.रित्सा कोंडकर(महा) 6-0, 6-0;
रिशीता पाटील(महा) वि.वि.योगांजली सारुक ६-०, ६-१;

मुले:
लक्ष गुजराथी(महा)(1) वि.वि.यशराज अग्रवाल(महा)6-3, 6-2;
आदित्य यादव (महा) वि.वि.आर्यन घाडगे (महा) 6-2, 7-6(7);
अनुज तशिलदार (महा) वि.वि.देवेश वधई 6-2, 0-6, 6-4;
सक्षम भन्साळी(महा)वि.वि.बाला वीर सिंग(महा)(8) 6-4, 6-4;
ओंकार शिंदे (महा)वि.वि.अर्णव हरिशंकर(तामिळनाडू) 7-6(8), 6-4;
नीरज रिंगणगावकर (महा)वि.वि.रोहन बजाज (महा) 6-2, 6-3;
वरद उंद्रे(महा)वि.वि.शिवम पडिया(महा) 6-3, 6-3;
नील जोगळेकर(महा)(6)वि.वि.नचिकेत गोरे(महा) 6-0, 6-0;