एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत अर्जुन किर्तने , अव्दिक नाटेकर, अवनीश चाफळे यांचा दुस-या फेरीत प्रवेश

पाचगणी, दि.21 नोव्हेंबर 2018ः रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् कर्नाटकच्या  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत अर्जुन किर्तने , अव्दिक नाटेकर, अवनीश चाफळे,मनन अग्रवाल व ओंकार शिंदे  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अर्जुन किर्तने याने  आदित्य यादवचा 6-3, 7-6(2) असा तर ओंकार शिंदेने कृशांक जोशीचा 7-5, 0-6, 6-1 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. मनन अग्रवालने शिवतेज शिरफुलेचा 6-2, 6-3 असा तर अव्दिक नाटेकरने अयान शेट्टीचा 6-3, 6-2 असा पराभव केला. सिद्धांत कुलकर्णीने अहान डे याचा 6-1, 6-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:
मनन अग्रवाल (महाराष्ट्र) वि.वि शिवतेज शिरफुले ( महाराष्ट्र  ) 6-2, 6-3
बलवीर सिंग (
 महाराष्ट्र   वि.वि   नचिकेत गोरे ( महाराष्ट्र  ) 6-2, 6-2
अर्जुन किर्तने (
 महाराष्ट्र   वि.वि   आदित्य यादव ( महाराष्ट्र  ) 6-3, 7-6(2)
अव्दिक नाटेकर (
 महाराष्ट्र   वि.वि   अयान शेट्टी ( महाराष्ट्र  ) 6-3, 6-2
नील केळकर (
 महाराष्ट्र   वि.वि   यशराज जारवाल ( महाराष्ट्र  ) 6-1, 6-3
अवनीश चाफळे (
 महाराष्ट्र   वि.वि  प्रजीत रेड्डी ( महाराष्ट्र  ) 6-0, 6-1
ओंकार शिंदे (
महाराष्ट्र वि.वि   कृशांक जोशी ( महाराष्ट्र  ) 7-5, 0-6, 6-1
देवेश वधाई (
महाराष्ट्र वि.वि   आदित्य रानवडे ( महाराष्ट्र  ) 6-1, 6-3
अहान शेट्टी (
 महाराष्ट्र   वि.वि   कौशिक कचरे ( महाराष्ट्र  ) 6-0, 6-1
पियुष जाधव (
 महाराष्ट्र   वि.वि   शौर्य बिराजदार ( महाराष्ट्र ) 6-0, 6-2
दिव्यांक कवितके (
 महाराष्ट्र  वि.वि  अवनीश सुतार ( महाराष्ट्र) 6-1, 6-1
सिद्धांत कुलकर्णी (
 महाराष्ट्र   वि.वि   अहान डे ( महाराष्ट्र ) 6-1, 6-2
ईशान खदीर (
 महाराष्ट्र   वि.वि  रोहन बजाज ( महाराष्ट्र  ) 6-1, 6-3